पद्मश्रींच्या सोलापूर कार्यालयात लाथाळ्या ! आवृत्तीप्रमुखाने उपसंपादकाला बदडले ...


सोलापूर - पद्मश्रींच्या सोलापूर आवृत्ती शेवटच्या घटका मोजत असतानाच, आता तेथे आवृत्तीप्रमुख व उपसंपादकात लाथाळ्या झडल्यात. न विचारता बातमी का छापली म्हणून सोलापूर आवृत्तीप्रमुखाने उपसंपादकाला चक्क लाथा व चपलाने कार्यालयातच बेदम मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या उपसंपादकानेही आपली 'हुक्की' दाखवत त्याला लाथांचा प्रसाद दिला.


 या दोघांनाही पद्मश्रींनी कोल्हापुरात बोलावून चांगलीच कानउघाडणी केली. त्यावर तोंड'पाटिल'की करणार्‍या वरिष्ठ बॉसने उपसंपादकालाच राजीनामा देण्याचे फर्मान सोडल्याने अन्याय झालेल्या या उपसंपादकाने 'धाकट्या मालकास' फोन करून राजीनामा घेतला तर जीव देईल, अशी धमकी भरली. हे महाभारत घडते न घडते तोच वितरणाच्या प्रमुखाने आवृत्तीप्रमुखाविरोधात पद्मश्रींकडे गंभीर स्वरुपाची लेखी तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेऊन पद्मश्रींनी आवृत्तीप्रमुखाची चौकशी सुरु केली आहे. 


आवृत्तीप्रमुख 'अमृता'ने पद्मश्रींच्या सोलापूर कार्यालयात विष कालवल्याची भावना तेथील कर्मचार्‍यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगले संपादकीय कर्मचारी सोडून गेले आहेत. तसेच, वितरण व जाहिरात विभागातही खदखद निर्माण झाली आहे. आधीच तोट्यात असलेली ही आवृत्ती आणखी गाळात रूतत चालली आहे. आवृत्तीप्रमुखाच्या पाठीशी कोल्हापुरात तोंड'पाटिल'की करणारा वरिष्ठ असल्याने या आवृत्तीप्रमुखाने उपसंपादकाला कार्यालयातच चपलाने बदडूनही कारवाई झाली नाही.

Post a Comment

0 Comments