‘मदना’च्या आशिवार्दाने ‘मोहना’ची सुटका,
शशिच्या कांताचा बळी शक्य
सांगली - पद्मश्रींच्या नगर कार्यालयानंतर आता सांगली कार्यालयात बातमीसाठी एकाच व्यक्तीकडून दोघांना दक्षिणा दिल्याने मोठे रणकंदन झाले. सांगलीतील ‘बाहुबली’ने एक बातमी छापण्यासाठी मोहनाला दक्षिणा दिली होती. मात्र त्यानंतर मोहनाच्या तब्येतीत बिघाड झाला. त्यामुळे त्याने ‘बाहुबली’ची ती बातमी छापलीच नाही. मोहनाशी चर्चा झाल्यानंतर ‘बाहुबली’ने शशिच्या कांताशी संपर्क केला. त्यावेळी शशिच्या कांताला मोहनाला दक्षिणा मिळाल्याची माहीती मिळाली. त्यानंतर त्याने ‘बाहुबली’कडे दक्षिणेची मागणी केली.
नाईलाजास्तव ‘बाहुबली’ने त्यालाही दक्षिणेचे पाकीट दिले. सुमारे दोन महिन्यांपूर्वी हा प्रकार घडला होता. त्यानंतर सांगली कार्यालय सु‘नील’ करण्यासाठी आलेल्याने एका ग्रामीण भागात वार्ताहर हवी असल्याची जाहिरात दिली. चिडलेल्या त्या वार्ताहराने नंतर चांगलेच ‘ढोल’ वाजवले. त्याचे ‘ढोल’ चांगलेच वाजले. त्याने ‘बाहुबली’च्या पंटरला फोन करून मोहना आणि शशिच्या कांताच्या दक्षिणेबाबत माहिती विचारली. नंतर तो ‘ढोल’ कॉल रेकॉर्डिंगच्या रुपाने आणखीच जोरात वाजू लागला. त्यानंतर अलिकडेच सांगली कार्यालयातील सर्वांनाच कोल्हापूरच्या मांडवाखाली नेण्यात आले. त्यांनी बदली आणि पगारकपात करण्याचे तोंडी आदेश दिले. पण सांगलीच्या ‘मदना’चा मोहनावर फारच जीव असल्याने ‘बाहुबली’ला गप्प बसवण्याचा ‘मदना’ने आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे मांडवाखालून काढलेल्या आदेशाची अंमलबजावणीच झालेली नाही.
शिवाय मदनाच्या वजनामुळे दोघांना शिक्षाच होणार नसल्याची चर्चा आता रंगली आहे. मात्र एकदा मांडवाखाली गेल्याने मोहनासह शशिच्या कांताला शिक्षाही मिळणारच असेच आता पद्मश्रींच्या सांगली कार्यालयात बोलले जात आहे. शिवाय पद्मश्रींच्या वारसदारांपर्यंत ही बातमी पोहोचू नये याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. त्यामुळे छोटे मालक आता दक्षिणाखोरांवर कारवाई करावी यासाठी सांगली कार्यालयातील अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत.
दरम्यान अडचणीच्या काळात सांगलीची धुरा सांभाळायला आलेल्या सु‘नील’च्या कारनाम्यांची चर्चाही जोरात सुरू आहे. त्याने बांधकाम, पाटबंधारेसह जिल्ह्यातील दोन नंबरवाल्यांना चांगलेच ब्लॅकमेल केल्याची चर्चा आहे. मात्र छोट्या मालकांसह ‘मदना’च्या मर्जीत असल्याने सु‘नील’ निलच असल्याचे सांगितले जात आहे. हा नील विशेष वृत्ताच्या नावाखालीच लाखोंच्या दक्षिणा घेत असल्याची चर्चा या रणकंदना दरम्यान सुरू झाली आहे. त्यामुळे दक्षिणा घेणार्यांना हा नील पाठीशी घालत असल्याचीही चर्चा आहे.
0 टिप्पण्या