‘एबीसी’च्या अध्यक्षपदी प्रतापराव पवार यांची निवड

 


नवी दिल्ली : सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनच्या (एबीसी) अध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे. ही निवड २०२२-२०२३ या वर्षासाठी असेल. प्रतापराव पवार हे पुण्यातील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे माजी अध्यक्ष असून त्यांचा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या संचालक मंडळात समावेश आहे. त्यांना केंद्र सरकारने २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. ते अध्यक्ष असलेल्या ‘सकाळ’ने ९० वर्षांच्या परंपरेत अनेक सामाजिक घडामोडींमध्ये सहभाग नोंदवला असून या संस्थेने जनमानसात विश्‍वासाचे स्थान निर्माण केले आहे, असे ‘एबीसी’ने म्हटले आहे.


‘एबीसी’च्या उपाध्यक्षपदी आर. के. स्वामी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासन के. स्वामी यांची निवड झाली आहे. रियाद मॅथ्यू (मलायला मनोरमा) यांची मानद सचिव म्हणून, तर विक्रम साखुजा (मॅडिसन कम्युनिकेशन) यांची मानद खजिनदार म्हणून नियुक्ती झाल्याचे ‘एबीसी’चे सरचिटणीस होर्मुझ्द मसानी यांनी निवेदनाद्वारे जाहीर केले आहे.


‘एबीसी’वरील इतर सदस्य


होर्मुसजी एन. कामा, शैलेश गुप्ता, प्रवीण सोमेश्‍वर, मोहित जैन, ध्रुव मुखर्जी, करन दर्डा, शशीधर सिन्हा, प्रशांतकुमार, देवव्रत मुखर्जी, करूणेश बजाज, अनिरुद्ध हलदर, शशांक श्रीवास्तव.

Post a Comment

0 Comments