माध्यमाचा फेरफटका / बेरक्याच्या नजरेतून ....

   फौजदारचा झाला कॉन्स्टेबल टीआरपी घसरल्यामुळे प्रसन्न जोशी यांना साम न्यूज चॅनलमधून नारळ देण्यात आला  होता. त्यानंतर जोशी यांनी दोन ठिकाणी प्रयत्न केले पण तिथे डाळ न शिजल्याने  शेवटी त्यांना नाइलाजास्तव  झी २४ तासमध्ये सिनिअर अँकर म्हणून जॉईन व्हावे लागत आहे.

साममध्ये कार्यकारी संपादक म्हणून काम केलेल्या जोशी बुवांना सिनियर अँकर पदावर समाधान मानावे लागत असल्याचे  पाहून फौजदारचा झाला कॉन्स्टेबल असेच म्हणावे लागेल.        

    पुढारीच्या न्यूज चॅनलचे नाव ठरले 

       


पुढारी माध्यम समूह लवकरच सॅटेलाईट न्यूज चॅनल सुरु करीत आहे.येत्या दोन महिन्यात चॅनल ऑन एयर होणार आहे.  या चॅनलचे नाव पुढारी न्यूज असे ठरले असून, त्याचा लोगो नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. तुळशीदास भोईटे या चॅनलचे कार्यकारी संपादक असून, विठोबा सावंत इनपुट हेड तर अमोल जोशी अँकर हेड आहेत. सध्याची टीम पाहता नव्या बाटलीत जुनी दारू दिसत आहे. 


सामच्या कार्यकारी संपादकपदी तळेकर 


  साम  न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादकपदी विनोद तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रसन्न जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर तळेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साम चॅनल टीआरपीमध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. टीआरपी वाढवण्याची जबाबदारी तळेकर यांनी घेतली आहे. 


टीआरपीमध्ये न्यूज स्टेटने लोकशाहीला मागे टाकले 


नवीनच सुरू झालेल्या न्यूज नेशनच्या न्यूज स्टेट चॅनलने टीआरपीमध्ये लोकशाहीला मागे टाकले आहे. मागील दोन आठवड्याच्या  टीआरपीमध्ये लोकशाही खूपच मागे पडल्याने संपादक कमलेश सुतारचे वांदे झाले आहेत.  चॅनलचा टीआरपी वाढवून दाखवितो म्हणून सुतारने मोठं मोठ्या गप्पा मारल्या होत्या. पण या गप्पा खोट्या ठरल्याने मालक आणि सुतार मध्ये चांगलेच वाजले आहे.Post a Comment

0 Comments