TV मध्ये 9 वर्षेही धड करिअर न झालेल्या महिला न्यूज अँकरची रेल्वेच्या महिला तिकीट चेकिंग स्टाफला शिवीगाळ


मुंबई - TV मध्ये 9 वर्षेही धड करिअर न झालेल्या न्यूज अँकरची रेल्वेच्या महिला तिकीट चेकिंग स्टाफला शिवीगाळ, विनातिकीट प्रवास करताना पकडले म्हणून घातला गोंधळ; दंड भरण्यास नकार; TV चा व मंत्र्यांचा धाक दाखवून नोकरीवरून काढून टाकायला लावण्याची महिला TC ना धमकी; याक्षणी राडा पोहोचलाय दादर RPF मध्ये!


• न्यूज अँकरच्या "पाटीलकी"ने रेल्वे स्टाफ अवाक; विनातिकीट प्रवास करूनही सापडल्यावर दंड भरायला नकार देऊन रेल्वे स्टाफशी हुज्जत घालून शिवीगाळ करणारी संबंधित अँकर उत्तर महाराष्ट्रातील असल्याची प्राथमिक माहिती


• दादरहून 3:20 ला ठाणे जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडल्याचे समजते. सेकंड क्लास डब्यात संबंधित प्रवासी विनातिकीट आढळून आला. त्यानंतर तिकीट चेकिंग स्टाफला 200-250₹ चा दंड भरण्यास नकार देऊन हुज्जत घातली. संबंधित अँकरने प्रतिष्ठेचा मुद्दा करून वाद वाढविला. TV मध्ये 9 वाजल्यापासून महत्त्वाची धुरा सांभाळणारी मी चौथा स्तंभ, मला ओळखत नाही म्हणून अँकरने केली राड्याला सुरुवात. शेवटी प्रवासी ऐकतच नसल्याने स्टाफने तक्रार केल्यावर पोलिसांनी नेले पोलिस स्टेशनमध्ये. सुमारे 4 तास संबंधित अँकरने दादर स्टेशन, RPF डोक्यावर घेतले आहे.


 GRP अन् पोलिस सुध्दा हैराण झाले आहेत. महिला TC ना संबंधित अँकरने दिली "धंद्याला लावण्याची" धमकी! सोशल मीडियावर शहाणपणाच्या गोष्टी शिकविणाऱ्या अँकरचे वर्तन मात्र उद्दाम आणि कायद्याला धरून नसलेले. अँकरने UTS ॲप डाऊनलोड केले असते तरी सेकंड क्लासचे दहा रुपयाचे तिकीट प्रवास सुरू होण्यापूर्वी दहा सेकंदात निघाले असते. दंड भरण्याचा मुद्दा राहिला बाजूला, स्टार अँकर अन् चौथा स्तंभ, सोशल मीडिया स्टार ला ओळखले नाही म्हणून इगो दुखावला, प्रतिष्ठेचा मुद्दा केला. आता चोराच्या उलट्या बोंबा, रेल्वे स्टाफनेच शिवीगाळ व मारहाण केल्याचे आरोप ... रेल्वे तिकीट चेकिंग स्टाफ उद्या CSMT स्थानकात सामूहिक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात!


अपडेट

....

लोकल रेल्वेत फुकटात प्रवास करणाऱ्या महिला टीव्ही अँकरला  शेवटी 200 रुपये दंड भरावा लागला. लेखी माफी देखील मागितली आहे. 

सोशल मीडियावर उपदेशाचे डोस पाजणारी ही महिला अँकर नेहमीच फुकटात प्रवास करीत असे अशी चर्चा रंगली आहे..

इतकेच काय तर इतर अँकरकडून छान दिसतो ड्रेस  म्हणून काही दिवसासाठी मागून घ्यायचे आणि परत करायचे नाहीत ही तिची वाईट सवय होती असे काही महिला अँकरचे म्हणणे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या