गुड न्यूज : NDTV लवकरच मराठीत येणार !

 

मुंबई -  अदानी समुहाच्या NDTVला चार  प्रादेशिक वृत्तवाहिन्या प्रसारित करण्याची परवानगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिलीय. NDTV राजस्थान, NDTV मध्यप्रदेश-छत्तीसगड, NDTV गुजराती, NDTV मराठीला अपलिंक-डाऊनलिंक प्रसारणाची परवानगी मिळालीय.


 21 ऑगस्टला NDTV मध्यप्रदेशचं लाँचिंग होतंय ! त्यानंतर लवकरच NDTV मराठी सुरु होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस येणार आहेत. 


एबीपी माझा, झी २४ तास,न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९, पुढारी न्यूज, साम टीव्ही, न्यूज नेशन मराठी, लोकशाही, जय महाराष्ट्र या मराठी चॅनेलच्या भाऊगर्दीत आता एनडीटीव्ही मराठीचीही भर पडणार आहे. एनडीटीव्हीच्या संपादकपदावर कुणाची वर्णी लागणार, सुरुवात कधीपासून होणार, लोकसभेपूर्वीच लाँचिंग होणार का याबाबत मात्र साशंकता आहे.


(( एनडीटीव्ही मराठीत येणार आहे मात्र अदानी समुहानं एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानं स्वघोषित पुरोगामी पत्रकार काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलंय.. ))



एनडी टीव्ही न्यूज बातमी

Post a Comment

0 Comments