लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

 


मुंबई - भाजप नेते ,माजी खासदार किरीट सोमय्या यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही चॅनलवर प्रसारीत करून समाज माध्यमात बदनामी केल्याप्रकरणी  लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


 आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी  माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई  पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार दिली असता उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भा. दं. वि. ५०० (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(ई) आणि ६७ (अ) अंतर्गत सुतार आणि थत्ते यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. मंगळवारी सोमय्या यांचा जबाब देखील नोंदवण्यात आला होता.


कोणत्याही महिलेची तक्रार नसताना, केवळ  बदनामी करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही चॅनलने प्रसारित केल्याचा आरोप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे.विरोधी पक्षाच्या एका आमदाराचे शेअर्स लोकशाही चॅनलमध्ये असून, त्यांचे बिंग फोडल्यामुळे आपल्याविरुद्ध लोकशाही चॅनलने बदनामीची मोहीम उघडल्याचे सोमय्या यांनी जबाब दिला आहे. 



लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार यांच्याविरुद्ध आणखी एक तक्रार सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे, एका प्रतिस्पर्धी चॅनलच्या संपादकाविरुद्ध खोटी आणि बदनामीकरक पोस्ट लिहून व्हाट्स अँपवर व्हायरल केल्याप्रकरणी ही  चौकशी सुरु आहे. आपण लोकशाहीचे तारणहार असल्याचे सांगणारे कमलेश सुतार हे कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने त्यांचे सध्या काही  'खरे' दिसत नाही . 


दरम्यान, साम चॅनलमधून  लोकशाही चॅनलमध्ये गेलेल्या एका कर्मचाऱ्यावर वर डाटा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा मास्टरमाईंड नेमका कोण आहे ? याची देखील सध्या चौकशी सुरु आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या