काळजी तुमची, हित महाराष्ट्राच्या फांदीवरचा 'डोमकावळा' उडाला ...

 



मुंबई - .'काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं' डिजिटल विभागामध्ये मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी देणारा , रात्री अपरात्री धमकीचे फोन करणारा फांदीवरचा डोमकावळा अखेर स्वतःच उडाला आहे. 


'काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं' डिजिटल विभागाममध्ये 'पाटील ' की दाखवून  कर्मचाऱ्यांना  राजीनामा द्यायला भाग पाडणे. लोकांच्या कामात अडथळा आणणे त्यांना काम करू न देणे आणि मग त्यांच्या कामाचा रिपोर्ट कसा खराब आहे हे वर दाखवणे आणि तुम्ही सोडा नाहीतर मी काढतो असं म्हणणारा डोमकावळा अखेर स्वतःचा उडाल्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे. 


बातमीचा सेन्स नसलेला क्लिकबेल्ट पत्रकार म्हणून ओळख असलेला हा डोमकावळा ऑफीसला दुपारी  २.३० - ३ वाजता येत असे. ड्युटी चालू असताना अधून - मधून बसल्या -बसल्या डुलक्या घेत असे. त्याला आज नेमके काय घडले हे देखील माहित नसायचे.  नितीन देसाई सारखा मोठा माणूस वारल्या नंतर त्याची त्याची त्याला अजिबात खबर नव्हती.  ऑफीसला आल्यावर स्वतःचं चॅनल बघून झोपेतून जागं होणे, अशी त्याची नेहमीची सवय होती. 


सणासुदीला आपण नेमकी किती लोकांना सुट्टी दिलीये याचा थांगपत्ता त्याला नव्हता,. आपल्याकडे लोकं किती ते काय करतात यातली माहिती देखील नसत. मॅनेजमेंटचा प्रचंड अभाव असलेल्या डोमकावळा फांदीवरून निघून गेल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आनंद देखील व्यक्त केला आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या