मुंबई - दर गुरुवारी मराठी न्यूज चॅनलचा टीआरपी जाहीर केला जातो. आज दि. ३० नोव्हेंबर ( गुरुवार ) रोजी आलेल्या टीआरपीमध्ये टीव्ही ९ मराठी पुन्हा एकदा नंबर वन मराठी न्यूज चॅनल ठरले आहे. झी २४ तास दुसऱ्या तर न्यूज १८ लोकमत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मागील १५ वर्षाच्या इतिहासात एबीपी माझा चौथ्या क्रमांकावर प्रथमच फेकले गेले आहे.त्यामुळे चॅनलवरच डोळे उघडण्याची वेळ आली आहे.
मराठी न्यूज चॅनलमध्ये न्यूजचा राजा म्हणून स्वतःची पाठ थापटून घेणाऱ्या एबीपी माझाची दिवसेंदिवस घसरण होत आहे. चॅनलमध्ये 'साहेब विरुद्ध बाईसाहेब' असा वाद सुरु असून, साहेबाची दिल्लीत बदली होऊनही ते सतत गल्लीत म्हणजे मुंबईत राहत आहेत.त्यामुळे चॅनलची लाईन ठरत नाही. तसेच अनेक गुणी आणि चांगले कर्मचारी अंर्तगत गटबाजीला कंटाळून दुसऱ्या चॅनलमध्ये निघून गेले आहेत. त्यामुळे चॅनलचा टीआरपी प्रचंड घसरला आहे.
एबीपी माझा सुरु होऊन १५ वर्षे झाली. किमान दहा वर्षे हे चॅनल पहिल्या नंबरवर होते .मध्यंतरी तीनवर गेले होते. झी २४ तासची एंट्री झाल्यानंतर आता चक्क चारवर गेले आहे. फॉल्स बातम्या, तोच तोच पणा , धाराशिवमध्ये बसून जगाच्या दिलेल्या फेक बातम्या टीआरपी घसरण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. माझा कट्टा आता वट्टा झाला आहे. नको त्याला कट्टयावर बोलवून एक तास वाया घालवला जात आहे. त्यात साहेब विरुद्ध बाईसाहेब शीतयुद्ध चॅनलच्या मुळावर उठले आहे. दर्जा न सुधारल्यास एबीपी माझा चार वरून पाचवर गेल्यास नवल वाटू नये.
Week 47: Saturday, 18th November 2023 To Friday, 24th November 2023
- Tv9 Marathi - 25.3
- Zee 24 taas - 16.5
- News 18 lokmat - 15.7
- ABP Majha - 15.5
- Saam - 13.4
- Lokshahi - 6.2
- Pudhari news - 4.6
विशेष म्हणजे पे चैनल असूनही झी २४ तासने दुसरा तर न्यूज १८ लोकमतने तिसरा नंबर राखला आहे. फ्री असलेल्या एबीपी माझा चक्क चारवर घसरला आहे.
BARC म्हणजे नेमके काय ?
बार्क (BARC) चे पूर्ण स्वरूप ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (Broadcasting Audience Research Council) आहे. हे टीआरपी म्हणजेच टेलिविजन रेटिंग पॉइंट ठरवते. बार्क (BARC) इंडिया एक संयुक्त उद्योग उपक्रम आहे ज्यास प्रसारणकर्ता (IBF), जाहिरातदार (ISA), जाहिराती आणि माध्यम संस्था (AAAI) चे प्रतिनिधित्व करणारे स्टॉकहोल्डर निधिबद्ध करतात. BARC India ची स्थापना वर्ष 2010 मध्ये झाली आणि याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. BARC हि जगभरातील सर्वात मोठी टेलिव्हिजन चे मूल्यमापन करणारी संस्था आहे.
कोणत्या पद्धतीचा वापर करते बार्क?
आधुनिक तंत्रज्ञान पद्धती आणि उद्योग यांचे मिश्रण करणे हे बार्क चे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.BARC India ही संस्था टेलिव्हिजन प्रेक्षक यांचे मूल्यमापन करणारी संस्था म्हणून एक पारदर्शी संचालन करते, अशी देखील ओळख जगभरात या संस्थेबद्दल केली जाते. ही व्यवस्था संपूर्णपणे पारदर्शी असते त्याच बरोबर ही व्यवस्था संपूर्णपणे सुरक्षित आणि भविष्यातील अनेक तंत्रज्ञान पद्धतीवर अवलंबून असते असे देखील म्हटले जाते.
TRP म्हणजे काय?
टीआरपी चे सक्षिप्त स्वरूप Television Rating Point असे आहे. टीआरपी हे असे एक साधन आहे ज्या साधनाच्या माध्यमातून टेलिव्हिजनवर कोणता प्रोग्राम किंवा कोणते टेलिव्हिजन चॅनल सर्वात जास्त पाहिले जात आहे. या टीआरपीच्या माध्यमातूनच प्रेक्षकांनी किती वेळ एखादा चॅनेल पाहिलेला आहे, याचे मूल्यमापन केले जाते. एखाद्या न्यूज चॅनेल ची किंवा एखाद्या प्रोग्रामची लोकप्रियता ठरवण्यासाठी टीआरपीची रेटिंग अत्यंत महत्त्वाची ठरत असतात.
भारतात ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (बार्क) नावाची ही संस्था आहे,ती संस्था टीव्ही चॅनलवरील टीआरपी चे मूल्यमापन करण्याचे कार्य करते. ही संस्था कोणते टेलिव्हिजन न्यूज चॅनल,, एखादा प्रोग्राम जास्त वेळ लोकांकडून पाहण्यात आलेला आहे व त्याचबरोबर लोकांनी कोणत्या न्यूज चॅनेल ला किंवा प्रोग्राम ला जास्त लोकप्रियता दिली आहे. ही संस्था वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी तपासून शोधण्याचा प्रयत्न करते.
अशी तपासली जाते टीआरपी?
ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउंसिल (बार्क) अनेक हजार फ्रीक्वेंसीचा डेटा घेऊन संपूर्ण टिव्ही चॅनेल च्या टीआरपीचे अनुमान लावते. ही संस्था टीआरपी चे मूल्यमापन करण्यासाठी एका विशेष गॅजेटचा वापर करते. टीआरपी मोजण्यासाठी काही विशिष्ट जागेवर बॅरोमीटर किंवा पीपल मीटर लावले जातात त्याचबरोबर काही हजारो प्रेक्षकांचा सॅम्पल म्हणजे नमुना म्हणून एक सर्वे देखील केला जातो.
सॅम्पल मध्ये समावेश करण्यात आलेल्या प्रेक्षकांना म्हणजेच जे प्रेक्षक जे टिव्ही पाहत असतात, त्यांना प्रतिनिधी समजून त्यांना १००टक्के मानले जाते. पीरोमीटर काही फ्रिक्वेन्सी च्या आधारावर ओळखण्याचा प्रयत्न करते की ,कोणता प्रोग्राम किंवा एखादा चॅनेल किती वेळा आणि सर्वात जास्त पाहिला जात आहे. या मीटरद्वारे एक – एक मिनिट टीव्ही ची माहिती मॉनिटरिंग संस्थेपर्यंत पोहोचवली जाते.ही टीम बॅरोमीटरद्वारे प्राप्त झालेल्या माहितीद्वचे विश्लेषण करते आणि कोणत्या चॅनेलला किंवा प्रोग्राम ला किती टीआरपी मिळाली आहे याबद्दलचा अहवाल प्रदर्शित करते.
टीआरपी से मूल्यमापन करण्यासाठी एका प्रेक्षकाने द्वारे नेहमी पाहिल्या जाणाऱ्या प्रोग्राम ला आणि वेळेला सातत्याने रेकॉर्ड केले जाते आणि मग हा डेटा 30 पटीने गुणुन त्या प्रोग्रामचे रेकॉर्ड काढले जाते. हे बॅरोमीटर कोणत्याही टीव्ही न्यूज चॅनेल बद्दल आणि त्याच्या प्रोग्राम बद्दल संपूर्ण माहिती देत असते.
टेलिविजन रेटिंग पॉइंट (TRP) च्या हिशेबानुसार सर्वात जास्त लोकप्रियता चॅनेल ची लिस्ट बनवली जाते आणि मग आठवड्यातून किंवा महिन्यातून टॉप 10 टीआरपी टीव्ही सिरीयल ,टीव्ही न्यूज चॅनेल यांची माहिती सर्वांना सांगितली जाते.
का गरजेची आहे TRP?
TRP चा थेट का संबंध टीव्ही किंवा न्यूज चॅनलच्या कमाईशी असतो. ज्या चॅनेलचा TRP कमी असतो म्हणजेच एखादे चॅनल प्रेक्षक कमी पाहत असतात, त्या चॅनेलची टीआरपी कमी होऊन जातो. त्या चॅनेल वर जास्त प्रमाणात जाहिरातदाराकडून जाहिराती प्रदर्शित केल्या जात नाही किंवा ज्या जाहिराती प्रसारित केल्या जातात त्या अगदी कमी दराने प्रसारित होत असतात. जाहिरातदारांसाठी टीआरपी हे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरत असतो. ज्या चॅनेल ची किंवा प्रोग्रामची टीआरपी रेटिंग जास्त असते.या चॅनल ला प्रेक्षक जास्त पसंती देत असतात आणि म्हणूनच जाहिरातदारांचा कल देखील अशाच न्यूज चॅनेल किंवा प्रोग्राम यांच्याकडे असतो. कोणत्याही जाहिरातदारांना आपल्या उत्पादनाची ओळख व उत्पादनाबद्दल ची सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी अशी वाटत असते म्हणूनच प्रत्येक जाहिरातदार जास्त टीआरपी असलेल्या चॅनल कडे आपोआप वळतात.
0 टिप्पण्या