या पत्रकारांची देखील एसआयटी मार्फत चौकशी करा ...


जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी या गावात १ सप्टेंबर २०२३ रोजी मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून  लाठीचार्ज झाला आणि हे गाव पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. या अगोदर या गावात एकही इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पत्रकार फिरकला नव्हता. या गावात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाचे कव्हरेज 'पिपली लाइव्ह 'चित्रपटाप्रमाणे आजतागायत सुरु आहे.


मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या आडून छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील  इलेक्ट्रॉनिक मीडियातील कोणकोणत्या पत्रकारांनी स्वतःचे खिसे भरले, याची रसभरीत चर्चा सुरु आहे. जरांगे पाटील हे माझे ऐकतात म्हणून काही पत्रकारानी राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल केल्याची चर्चा सुरु आहे. आमच्या नेत्यांविषयी प्रश्न विचारू नका, म्हणून काही जणांनी पत्रकारांना पाकिटे दिल्याचे समजते. 


पत्रकाराला जात नसते , मात्र गेलीं पाच  महिने इलेक्ट्रॉनिक मीडियावाले पत्रकारितेच्या नावावर आपली जात दाखवत राहिले.. अगदी जरांगे पाटील यांना संडासला घेवून जाणे ते पाणी पाजणे इथपर्यंत काम केले. त्यांनी काय बाईट द्यावी हे देखील शिकवले. सोशल मीडियावर काय सुरु आहे, कोण काय बोलतो, कोणत्या नेत्याने काय  बाईट दिली हे देखील सांगून त्यांना मिस गाईड करण्याचे काम केले. आंदोलनाच्या आडून काही पत्रकारांनी लाखो रुपयाची कमाई केली. 

अंतरवाली सराटीच्या आंदोलनाची राज्य सरकार एसआयटी मार्फत चौकशी करणार आहे. त्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथील इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांनी देखील चौकशी करण्यात यावी. कोणकोणत्या पत्रकारांनी या आंदोलनात पाकिटे घेतली, मुंबईहून आलेल्या कोणत्या न्यूज अँकरला पैसे मिळाले, पत्रकारितेतील कोणते 'बडे ' मासे यात गुंतले आहेत. कुणी एमआयडीसीमध्ये भूखंड लाटला,याची देखील चौकशी झाली पाहिजे.चौथा स्तंभ यानिमित्त चोथा स्तंभ झाला, हे मात्र नक्की.


- बेरक्या उर्फ नारद

Post a Comment

0 Comments