धाराशिव - धाराशिवच्या टीव्ही मीडियामध्ये तीन पत्रकारांना चॅनलमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही हकालपट्टी दोन वेगवेगळ्या घटनांमुळे झाली आहे, ज्यामुळे शहरात मोठा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.
पहिली घटना सांजा रोडवरील एका बियरबारमध्ये घडली. या बियरबारमध्ये एक पत्रकार फुकट दारू पिण्यासाठी गेला होता. दारूच्या नशेत त्याने बियरबारमध्ये राडा केला, ज्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलच्या पत्रकाराने काढला आणि तो व्हिडिओ राडा करणाऱ्या पत्रकाराच्या व्यवस्थापकाकडे पाठवला. या घटनेनंतर संबंधित चॅनलने त्या पत्रकाराची तात्काळ हकालपट्टी केली.
दुसरी घटना या घटनेच्या प्रतिक्रियेतून पुढे आली. हकालपट्टी झालेल्या पत्रकाराने, ज्याने व्हिडिओ काढला होता, त्याचा एक जुना व्हिडिओ शोधून काढला. या व्हिडिओमध्ये, पत्रकार एका चोराखळीच्या तमाशा बारीमध्ये कपडे काढून नाच करताना दिसतो. हा व्हिडिओ त्याने त्या पत्रकाराच्या चॅनलकडे पाठवला. त्यामुळे त्या चॅनलने त्याची आणि आणखी एका पत्रकाराची हकालपट्टी केली.
या घटनांमुळे धाराशिवच्या टीव्ही मीडियामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मीडियाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पत्रकारांच्या असामाजिक वर्तनामुळे त्यांच्या चॅनल्सनी कठोर पाऊले उचलली आहेत. धाराशिवच्या पत्रकारांच्या समुदायाने या घटनांवर कठोर टीका केली असून, मीडियाच्या नीतिमत्ता आणि जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
हा लेख नक्की वाचा
पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात
0 टिप्पण्या