खोट्या पत्रकारांचा सुळसुळाट: सरकारी अधिकारी आणि राजकारण्यांना ब्लॅकमेल करण्याचे नवे धाडस

 



पुणे - सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि राजकारण्यांच्या संवेदनशील बाबींवर दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या खोट्या पत्रकारांचा संख्येत वाढ झाली आहे. त्यांच्या किती बातम्या किंवा लेख प्रसिद्ध होतात, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.


मुख्य प्रवाहातील निवडक पत्रकारांना महाराष्ट्र शासनातर्फे 'ऍक्रिडेशन' दिले जाते. या 'ऍक्रिडेशन'मुळे पत्रकारांना रेल्वे आणि एसटी प्रवासात सवलत तसेच सरकारी 'सर्किट हाऊस' मध्ये कमी दरात राहण्याची सुविधा मिळते.


परंतु अलीकडच्या काळात या 'ऍक्रिडेशन'ची वाटणी अवास्तवपणे होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याआधी ऍक्रिडेशन समितीत पत्रकारांच्या ऐवजी सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश अधिक झाला होता, ज्यामुळे काही खोट्या, फसवणूक करणाऱ्या पत्रकारांनी संधी साधून 'ऍक्रिडेशन' मिळवले.


अशाच प्रकारातील एक व्यक्ती, जो एका परप्रांतातून आलेला आणि स्वतःला पत्रकार म्हणून सादर करत होता, त्याने फोटोग्राफर म्हणून 'ऍक्रिडेशन' घेतले होते. पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयात त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जवळीक साधली आणि दलाल म्हणून पैसे कमवायला सुरुवात केली. त्याच्या ब्लॅकमेलिंगचा त्रास इतका वाढला की त्याने अकोला जिल्ह्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या कारवायांमुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि माहिती महासंचालनालयाने त्याचे वार्षिक 'ऍक्रिडेशन' रद्द केले.


तरीही हा 'मुच्छड' सरकारी कार्यालयात महाराष्ट्र शासनाचा पत्रकार असल्याचा दावा करत फिरतोय आणि उलटसुलट कामे करून घेण्यासाठी दबाव आणतोय. नुकत्याच घडलेल्या एका घटनात मामलेदार कचेरीतील नगरभूमापन विभागात तो पुरता उघड झाला.


'मी महाराष्ट्र शासनाचा पत्रकार आहे' असे भासवून त्याने एका अधिकाऱ्याला मालमत्ता पत्रकाचे काम करण्यास सांगितले. काम न झाल्यावर त्याने शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्याचे नाव घेत दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण तेथे उपस्थित माध्यमकर्मीने हा प्रकार ओळखला आणि त्याच्यासमोर आल्यावर तोतया पसार झाला. ही माहिती शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्याला समजल्यावर त्यांनी त्याला धडा शिकवला. जिल्हा माहिती कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्याने तेही आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत.


याच तोतया पत्रकाराने गोड बोलून एका परिचिताची शिवाजीनगर गावठाणातील खोली ताब्यात घेतली आणि नंतर त्याच व्यक्तीला ब्लॅकमेल करून ती खोली जवळपास बळकावली. स्वतःची राहण्याची सोय कोंढव्यात असूनही तो परिचित आता ती खोली परत मिळवण्यासाठी धडपडतो आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या