कोल्हापूरचा 'पुढारी' नागपुरात पदार्पणास सज्ज, विदर्भातील वृत्तपत्रांमध्ये खळबळ



कोल्हापूरहून नागपुरात येण्याची तयारी करत असलेल्या दैनिक पुढारीच्या आगमनाने विदर्भातील वृत्तपत्र क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर हे वृत्तपत्रांसाठी आव्हानात्मक ठिकाण असून, येथे यशस्वी होण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. अनेक दिग्गज वृत्तपत्रांनी येथे आपले स्थान निर्माण केले असले तरी, 'लोकमत'ने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे.

पुढारीच्या आगमनाने सर्वाधिक फटका 'देशोन्नती'ला बसण्याची शक्यता आहे, कारण दोन्ही वृत्तपत्रांचा संपादकीय ढाचा सारखाच आहे. दोन्ही वृत्तपत्रांचे मालक एकमेकांचे 'सोयरे' असल्याने त्यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा ही औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

विदर्भातील शेतकरी चळवळ, स्वतंत्र विदर्भाची मागणी, शेतकरी आत्महत्या आणि औद्योगिक मागासलेपण यासारख्या मुद्द्यांवर काम करण्याचा पुढारीला फारसा अनुभव नाही. तरीही विदर्भात स्थिरावण्यासाठी ते स्थानिक संपादक शोधत आहेत.

पुढारीच्या आगमनाने विदर्भातील अनेक दैनिकांत मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अनेकांनी आतापासून आपली फिल्डिंग पुढारी व्यवस्थापनाकडे लावली आहे.

नागपुरात सध्या लोकमत, सकाळ, पुण्यनगरी, नवराष्ट्र, देशोन्नती, महाराष्ट्र टाइम्स, लोकशाही वार्ता, लोकसत्ता , नागपूर  तरुण भारत अशी ९ ते १० वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. पण लोकमतला आजवर कुणीच टक्कर देऊ शकले नाही. नव्याने येणारा पुढारी लोकमतला टक्कर देऊ शकेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या