धाराशिवमध्ये टीव्ही रिपोर्टरचा बिअर बार राडा ते ‘विकेट ड्रामा’ ! आता गोट्या चोळत बसण्याची वेळ ...

 


धाराशिवच्या पत्रकारितेत सध्या धुरळा उडाला आहे, आणि तो बिअर बारमध्ये सुरू झालेल्या 'राडा'मुळे! नाईन चॅनलचा महाकाय रिपोर्टर बिअरच्या घोटात गुंतला आणि तिथेच त्याची विकेट पडणार, हे उघडा डोळे, बघा नीट चॅनल आणि अडाणी चॅनलच्या डिटेक्टिव्ह रिपोर्टरला आधीच ठाऊक होतं. कारण दोघांनी  सगळी व्यवस्था आधीच करून ठेवली होती. धुरळा उडत असताना उघडा डोळे, बघा नीट चॅनलच्या रिपोर्टरने अत्यंत चाणाक्षपणे व्हिडीओ शूटिंग करून अडाणी रिपोर्टरला सोपवला आणि त्याने नाईन  चॅनलच्या व्यवस्थापकाकडे  मेलद्वारे ‘सबूत’ पाठवला होता.


दुसऱ्या बाजूला, नाईन रिपोर्टर देखील काही कमी नव्हता! आपली विकेट जाणार, हे कळल्यावर त्यानेही 'मायक्रो प्लॅनिंग' केलेलं होतं. तो आपला उघडा डोळे, बघा नीट आणि अडाणी चॅनलच्या रिपोर्टरला थेट एका तमाशाबारीवर घेऊन गेला, तिथे त्यांनी दिलखुलास नंगानाच केला आणि त्याचा व्हिडीओ आधीच आपल्या गुप्त आडदांड फोल्डरमध्ये सेव्ह करून ठेवला. इथे सगळ्यांचे डोळे एकमेकांवर होते! नाईन रिपोर्टरचा डोळा उघडा डोळे, बघा नीट चॅनलवर, तर अडाणी रिपोर्टरचा नाईन चॅनलवर!


नाईनची  विकेट पडल्यावर ‘उघडा डोळे, बघा नीट’ , अडाणी चॅनलचा  रिपोर्टर, त्यांचा तुळजापूरचा स्मार्ट मित्र, एक कॅमेरामन मिळून एका ए-वन हॉटेलमध्ये जंगी पार्टी केली. स्मार्ट मित्राने बिल दिलं, पण त्याचे कारण मात्र सांगितलं नाही. तिथे मात्र परिस्थिती उलटली! नाईन रिपोर्टरचा बळी उघडा डोळे, बघा नीट आणि अडाणी चॅनलच्या रिपोर्टरने घेतला, आणि  उघडा डोळे, बघा नीट आणि अडाणी चॅनल रिपोर्टरचा बळी नाईनने घेतला! अर्थात, "हम भी डुबेंगे सनम, तुम्हारे साथ" अशी प्रेमभरी भावना तिथेच उमटली.


आता तिघेही गोट्या चोळत घरी बसले आहेत. नाईनची जागा 'जय श्रीराम'ने घेतली आहे, उघडा डोळे, बघा नीटची जागा एका कळंबकराने पटकावली आहे, आणि अडाणी चॅनलची जबाबदारी सक्षमताईंनी सांभाळली आहे! हे पाहून तुळजापूरचा स्मार्ट मित्र विचारतोय, "यह क्या हुवा, कैसे हुवा, हम क्या करे?"

तर हेच आहे पत्रकारितेतील ‘गोट्या चोळण्याचा’ अंतिम परिणाम!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या