आठ कर्मचाऱ्यांचा राजीनामा आणि विभाग प्रमुखांचा 'ओव्हरटाईम'!
न्यूज 18 लोकमतच्या डिजीटल विभागात सध्या चांगलाच गोंधळ माजला आहे. दोन महिन्यांत तब्बल आठ जणांनी ‘काय म्यॅन, बस झालं!’ म्हणत राजीनामा देऊन निघून जाणे पसंत केले. कारण एकच – विभाग प्रमुख! हे प्रमुख साहेब म्हणे ऑफिसपेक्षा जास्त वेळ ट्रेन स्टेशनवर दिसतात. असं म्हणतात की दादर स्टेशनवर फास्ट ट्रेन पकडण्याची जी कसरत असते, ती साहेबांनाही रोज हवाहवासी वाटते.
हे प्रमुख साहेब इतके डोकेफोडू आहेत की, ऑफिसमधल्या बायांना तर ओरडूनच घाबरवतात! इथे ‘ऑल इंडिया शोरिंग चॅम्पियनशिप’ असती तर हे साहेब आधी विजेते झाले असते. त्यांचे नेहमीचे वाक्य – "एबीपी माझा आणि टीव्ही9 मध्ये असताना...!" जणू काही तिथे त्यांनी देशाचं तारण केलं होतं! प्रत्येक वेळी ‘मी कसा भारी आहे’ हे सिद्ध करण्यासाठी यांचा कंठ फुटायची वेळ येते. पण बाकीच्यांना यांचं बोलणं म्हणजे दिवसभराचं डोकेदुखणं वाटतं.
तर हे साहेब कधी कधी शिफ्टमध्ये दिसतात, कधी लोअर परेलला चक्कर मारताना दिसतात, आणि बाकी वेळा व्हॉट्सअॅपवर कॉल करून कर्मचाऱ्यांना 'फ्री फंड'मध्ये धमकावत असतात. ऑफिसमधल्या लोकांना हा प्रश्न पडला आहे, हे साहेब नेमकं ऑफिसला येतात का की ट्रेनमध्येच शिफ्ट करतात!
वाटलं, इतके आठ जणं गेले, साहेबांची कारकिर्दीची शिफ्ट कधी संपते? पण हो, तसं काहीच झालं नाही. वरिष्ठ मंडळींनी सगळ्याला डोळेझाक केली, तसं काही तक्रारींवरदेखील मिटिंगमध्ये फाइल्स ठेवल्यासारखं धूळ झटकून सोडून दिलं. आठ जणं निघून गेल्यानंतर बाकीचे आता ‘अहो काढा की’ म्हणत टक्क लावून बसलेत.जणू हा कार्यालय नव्हे, तर ‘शो मस्ट गो ऑन’ असं काहीतरी प्रकरण झालं आहे!
"क्लिकबेटचा फुगा: हेडिंग भारी, बातमी फुसकी!"
पूर्वीचा जमाना काय मस्त होता, नाही? सकाळी चहा हातात घेऊन लोकं पेपर उघडायची, आणि त्या बातम्या वाचून डोळे विस्फारायचे. बातमीतील प्रत्येक शब्दावर लोकांचा इतका विश्वास होता की शेजाऱ्याच्या वावरात गायीने चारा खाल्ला तरी लोकं पेपरकडेच धाव घ्यायची खातरजमा करण्यासाठी! मग आला टीव्ही, लोकांनी ‘ब्रेकिंग न्यूज’चा आनंद घेतला. मात्र, आता डिजिटल मीडियाचा जमाना आला आहे, आणि या मीडियाने बातम्या चक्क आपल्या स्मार्टफोनवर आणून ठेवल्या. एक क्लिक करा आणि जगाच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या तुमच्यापुढे उभ्या ठाकतील. पण, बातम्यांचा दर्जा मात्र ‘होनहार बिरवान’सारखा खाली उतरू लागला आहे.
न्यूज १८ लोकमतसारख्या नामांकित मीडियाची बातमी पाहा. हेडिंग कसे काय दिलंय, "हनीमूनची पहिली रात्र, कपलने शेयर केला आपला प्रायव्हेट व्हिडीओ. रिल्सच्या नादात सगळेच दाखवले." आता हे वाचून आंबटशौकीन मंडळी लगबगीने बातमी उघडतील. "अरे काय विशेष आहे?" या उत्सुकतेने त्यांचे मोबाइल स्क्रीन चमकू लागतील. पण थांबा! बातमी वाचल्यावर कळेल की हे केवळ ‘क्लिकबेट’ आहे. सोशल मीडियावर पत्रकाराला "अरे, हे काय चाललंय?" म्हणून शिव्यांचा पाऊस पडणार!
बिचारा पत्रकार! व्हिडीओत काहीच विशेष नसताना, अशा चटकदार हेडिंगची योजना का आखली? उत्तर सोपं आहे - लोकांनी बातमी वाचावी म्हणून! या धंद्यात आता “हेडिंग भारी, बातमी शुद्ध फुगा” हा फंडा चालतोय! पाठोपाठ, लोक वाचतील, टीका करतील, आणि शेवटी हसत-हसत पुढच्या बातमीच्या शोधात निघतील.
0 टिप्पण्या