मुंबईत अदानी यांच्या मराठी चॅनलला सहा महिने झाले पण टीआरपीच्या आकड्यांचा हिशोब अजूनही सुरू नाही. बार्ककडे नोंदणी न झाल्याने प्रेक्षकांची संख्या झाकून ठेवण्याची खास ‘आर्ट’ या चॅनलने शिकवली आहे.
बाहेरून चॅनलची भव्यता जरी दाखवत असली तरी आतमधल्या कॅरेक्टर टेस्टला मात्र काहीच मान नाही, कारण झीमध्ये फेल झालेला आणि एबीपीमध्ये कॅरेक्टरलेस ठरलेला माणूस इथे “माणिक मोती” बनला आहे!
सदर व्यक्तीच्या खास शाळेत टोपी घालून झोपणे आणि डेस्कवर लवंडणे हा नित्यक्रम बनला आहे. कामाचं काय? ते सकाळच्या मैनावर सोडून दिलंय! पण मैनाची मात्र झगडण्याची सवय सुटत नाही. सतत पादा"पादी" सुरू असते. चॅनलमध्ये रोजच नवीन गॉसिप तयार होतंय. कोल्हापुरी खिचडी , साममधून आलेला तळेसाचे आणि माणिक मोतीचा ताण इतका वाढला की एका सीनियर व्यक्तीने शेवटी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
आता सिनियर कोण असं तुम्ही विचारालं ! ते म्हणजे एबीपी माझात इनपुट हेड असताना, पेमेंट वाढवून मिळतंय म्हणून इकडे आलेले घालपांडे ! घालपांडे तर गेलेच पण आता रोज एक नवा राजीनामा पडतोय आणि चॅनलला जशी भरती लागली होती, तितक्याच वेगाने ओहोटी सुरु झाली आहे.
असा हा अदानीच्या चॅनलचा आतला रसभरीत मामला आहे. टीआरपी असो वा नसो , राजकारण आणि घरातील उठाठेवीत चॅनल जोरात आहे, हे मात्र निश्चित!
0 टिप्पण्या