लातूर शहरातील एका धाब्यावर नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूच्या दोन पेगांनंतर 'फ्री स्टाईल' हाणामारीची रंगतदार मॅच पार पडली. या रोमांचक प्रकरणाचे नायक होते - 'उघडा डोळे, बघा नीट रिपोर्टर' उर्फ निशू फोटोकॉपी आणि ग्राफिक्स डिझायनिंगचा बादशाह मह्या मॅजिक!
प्रकरण असे की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 'निशू फोटोकॉपी'ने एका पराभूत उमेदवारासाठी सोशल मीडियावरून हवा करण्याचे आणि पत्रकारांना बातम्या-पॉकेट पुरवण्याचे महत्त्वाचे काम केले. त्यासाठी त्याने ग्राफिक्स डिझायनिंगसाठी मह्या मॅजिकला हाताशी घेतले होते. मात्र, "कॅश इन हँड"च्या व्यवहारात घोळ झाल्याने हे दोघे आपले हिशेब चुकते करण्यासाठी धाब्यावर भिडले.
पहिला राऊंड: दोघांनी एकमेकांच्या पेगमध्ये बर्फ टाकण्यावरून वाद सुरू केला.
दुसरा राऊंड: पेग संपताच 'फ्री स्टाईल हाणामारी'ला सुरुवात झाली. मह्या मॅजिकने आपल्या 'माऊस स्क्रोल' स्टाईलने वार केले, तर निशू फोटोकॉपीने 'मायक्रोफोन स्विंग'ने प्रत्युत्तर दिले.
धाब्यावर उपस्थित लोकांनी हा सामना पाहण्यासाठी कॅमेरे काढले, तर काहींनी चकण्यातून तोंडभर हसत या दंगलीचा आस्वाद घेतला. शेवटी धाब्यावरचा वेटर 'शहाजी' याने सामंजस्याचा माईक हातात घेऊन मॅच थांबवली आणि दोघांना वेगवेगळ्या दिशांनी धाडले.
सध्या लातूर शहरातील हाणामारीवर चर्चा चांगलीच रंगली आहे. लोक म्हणतात, "दारू होती, डिझाईन होती, पण डोकं मात्र दोघांचंच उडालं!"
तर, धाब्याचा मालक विचारात पडला आहे, "या दोघांच्या पुढच्या मॅचसाठी टिकिटं विकायला सुरुवात करावी का?"
0 टिप्पण्या