महिलांसाठी नवा अध्याय: सरिता कौशिक यांची एबीपी माझाच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती

 


मुंबई: एबीपी माझा या लोकप्रिय प्रादेशिक चॅनेलमध्ये सरिता कौशिक यांना कार्यकारी संपादकपदी पदोन्नती मिळाली आहे. प्रादेशिक चॅनेलच्या इतिहासात महिलेला असे महत्त्वाचे पद मिळण्याची ही पहिलीच वेळ असून, सरिता कौशिक या पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या एकमेव महिला ठरल्या आहेत.


सरिता कौशिक यांची पत्रकारितेतील कारकीर्द उल्लेखनीय असून, त्या दोन वर्षांपूर्वी नागपूर येथून सहाय्यक कार्यकारी संपादक या पदासाठी मुंबईत आल्या होत्या. तत्पूर्वी त्या नागपूर ब्युरो होत्या. या कालावधीत त्यांनी चॅनेलच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे.


त्यांच्या या पदोन्नतीने महिलांच्या पत्रकारितेतील नेतृत्वाला नवी दिशा दिली आहे. कौशिक यांच्या अनुभव आणि नेतृत्वामुळे प्रादेशिक पत्रकारितेत नवा अध्याय सुरू होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.


एबीपी माझा ने त्यांच्या पदोन्नतीचा निर्णय जाहीर करताना महिलांच्या प्रगतीसाठी वचनबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या