"हिट की फ्लॉप: एबीपी माझाच्या 'स्टार' प्रवासाची विनोदी गोष्ट"


मुंबई – "स्टार माझा" नावाने सुरुवात करून "एबीपी माझा" बनलेल्या या मराठी वृत्तवाहिनीने २००७ पासून अनेक अँकर, रिपोर्टर, आणि संपादकांना घडवले. पण इथल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य चॅनलमधून बाहेर पडल्यावर "हिट की फ्लॉप?" हा प्रश्न कायम चर्चेचा विषय ठरतोय.

"हिट" होणारे 'स्टार'

उमेश कुमावत हे एबीपीच्या "रिपोर्टर गँग"मधून बाहेर पडून थेट टीव्ही ९ मराठीचे संपादक झाले, आणि टीव्ही ९ ने नंबर १ चा मुकुट पक्का केला. तर निलेश खरे यांनी सामसाठी आपला "नंबर ३ किंवा ४" चा परफॉर्मन्स कायम ठेवला.

फ्लॉप शोची कमाल

मात्र, फ्लॉप यादीमध्ये "रात्री १० ची बातमी" फेम मिलिंद भागवत यांनी पहिला मान पटकावला. न्यूज १८ लोकमतमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्या चॅनलने "रात्री १० च्या झोपेचा" वारसा जपला, आणि अखेर ते निवृत्तीला सामोरे गेले.

प्रसन्न जोशी यांनी जय महाराष्ट्र, साम, आणि पुढारी न्यूज अशा "तीन ठिकाणी फ्लॉप होण्याचा" विक्रम केला. त्यांच्या प्रसिद्ध डिबेट शोची लोकप्रियता दुसऱ्या चॅनलवर नेमकी काय झाली? – फ्लॉप!

ज्ञानदा कदम यांनी न्यूज १८ लोकमतमध्ये स्थान मिळवले, पण प्रभावाची गोष्ट झाली तिथेच थांबली.काय सांगते ज्ञानदा ? म्हणून ऐकणारे प्रेक्षक आता चॅनल बदलू लागले आहेत. 


"आऊटपुटमधील पॅक"




राहुल खिचडी, ज्यांचा एबीपी माझाचा "आवाज" म्हणून उल्लेख व्हायचा, एनडीटीव्ही मराठीत पोहोचल्यावर "आवाजच बसला." त्यांच्या विशेष पॅकेज स्टोरींच्या व्हॉइस-ओव्हरने गाजवलेल्या यशाला तिथे "फेल"चा शिक्का बसला.एकंदरीत राहुलची खिचडी  एनडी टीव्ही मध्ये शिजलीच नाही !

माणिक मुंडे, जे एबीपीमध्ये "माणिक" होते, एनडीटीव्हीमध्ये "पाचू" झाले. यांना अजूनही "प्रभाव" शोधावा लागतोय.

राहुल कुलकर्णींचा "नाक घासण्याचा" प्रवास

"मी संपादक" अशी घोषणाबाजी करणारे राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठीमध्ये पोहोचले, पण स्टोरीज तशाच बोथट राहिल्या. आता ते यूट्यूबवर स्वतःची "बडबड" करत आहेत, पण बघणारे विचारतात – "एबीपीचा कुलकर्णी की राहुलचा फ्लॉप शो?"

म्हणजे नक्की काय?

एबीपी माझाचे माजी कर्मचारी बाहेर पडून "हिट" होतात की "फ्लॉप," हा त्यांच्या यशापेक्षा त्यांच्या पूर्वीच्या बढाईवरच ठरतोय. "आमच्यामुळे चॅनल चाललं," म्हणणाऱ्यांचा दुसरीकडे "फ्लॉप"चा वादळवारा उठतोय.

तुम्हीच सांगा – हिट कोण आणि फ्लॉप कोण? उत्तर मात्र विनोदी आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या