छत्रपती संभाजी नगरच्या टीव्ही9 च्या रिपोर्टर दत्ता कानवटे यांचा "कॅमेऱ्याचा कोन" पाहण्याचा अजब अंदाज आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. फ्रेम व्यवस्थित न घेतल्याच्या कारणावरून कॅमेरामनला "फ्रेम ने घेतली, पण थप्पड घेतली!" असं म्हणावं लागेल, कारण हे महाशय चक्क कानफडत आहेत!
विशेष म्हणजे, हा "थोबाड भेट कार्यक्रम" बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुरू असलेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान घडला आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येने महाराष्ट्रभर खळबळ माजली असताना, टीव्ही9 च्या प्रतिनिधीच्या या "जोरदार" कृत्याने चर्चेचा अजूनच उगम झाला आहे.
झी24 तासच्या थेट प्रक्षेपणात हा प्रसंग कैद झाला, जिथे "लाईव्ह" हा शब्द अक्षरशः जिवंत झाला. यापूर्वीही कॅमेरामन आडे यांना शिव्यांची लाखोली वाहून चर्चेत आलेले कानवटे आता थेट युवा कॅमेरामनला कानशिलात मारून "लाईव्ह थप्पड रिपोर्टिंग"मध्येही प्रावीण्य मिळवत आहेत.
"मारहाण लाईव्ह, आंदोलन सायलेंट!"
हत्येच्या निषेधार्थ जलसमाधी आंदोलन सुरू असताना असा माजोरडेपणा कोणी आणि कसा करू शकतो, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर #ThapadReporter असा ट्रेंड सुरू असून, अनेकांनी टीव्ही9 च्या व्यवस्थापनाला या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे.
आता "फ्रेम सेट करणे म्हणजे काय" याची जाणीव कानवटे यांना होईल की अजून काही नव्या प्रकारांनी ते चर्चेत येणार, हे पाहणे मनोरंजक ठरेल!
0 टिप्पण्या