मुंबई - अदानीच्या चॅनलमध्ये ‘माणिक मोती’ला अंतिम इशारा मिळाला आहे – "तुला शेवटचे दोन महिने मिळाले आहेत, काहीतरी कर नाहीतर बाहेर!" बस, एवढंच ऐकल्यावर हा माणूस अक्षरशः सैराट झालाय. आता त्याचा दिवस रागावण्यात आणि रात्री चिडचिड करण्यात जातोय.
चॅनलच्या तांत्रिक बाबतीत शून्य ज्ञान असलेला ‘माणिक मोती’ आता अचानक तांत्रिक तज्ज्ञ बनू पाहतोय! न्यूजपेक्षा त्याला सुपरफास्ट न्यूजमध्येच जास्त रस. सतत विचारतोय – "ही फूटेज ऑफलाइन का आहेत?" पण त्याला कुणीतरी सांगायला हवं की, बाबा रे, ही फूटेज अजून आलीच नाहीयेत! इनपुट टीममध्ये त्याचे इतके घनिष्ठ संबंध आहेत की, तिथल्या लोकांना तो काही बोलूही शकत नाही. उलट, प्रोड्यूसरनेच बातमी बनवलीय आणि ‘माणिक मोती’ गोंधळात पडलेला आहे.
चॅनलमधले अँकरही भन्नाटच! त्यांना कोणाशी, कसे बोलायचं याचं ताळतंत्र नाही. वरिष्ठांशी – मग वयानुसार असो किंवा अनुभवाच्या आधारे – संवाद कसा साधायचा हे कोणालाच ठाऊक नाही! एडिटर्स तर ‘डोळे झाकून’ फूटेज आणि बाईट्स पाठवत आहेत.
कोणत्याही शिफ्टमध्ये प्रोड्यूसर आणि एडिटर यांच्यात समन्वय नाही. हा गोंधळ बघून लोक विचारताहेत – हे चॅनेल चालतं तरी कसं? देवच जाणो!
(बेरक्या अजून खोदकाम करत आहे. पुढील अपडेटसाठी ‘बेरक्या उर्फ नारद’ वाचत राहा!)
0 टिप्पण्या