पत्रकारितेतले अनुभवी आणि धडाडीचे अँकर प्रसन्न जोशी पुन्हा एकदा एबीपी माझाच्या घड्याळाकडे वळलेत! अनेक वर्षे 'माझा'मध्ये तडाखेबंद अँकरिंग केल्यानंतर त्यांनी जय महाराष्ट्रमध्ये कार्यकारी संपादक म्हणून, साममध्ये संपादक म्हणून आणि पुढारी न्यूजमध्ये शो अँकर म्हणून आपली जबाबदारी निभावली.
डिबेट शोचे दिवस परत येणार?
अँकरिंगमध्ये धारदार शैलीसाठी ओळखले जाणारे प्रसन्न जोशी पुन्हा एकदा एबीपी माझाच्या स्क्रीनवर झळकणार आहेत! त्यांनी ‘माझा विशेष’ या चर्चित डिबेट शोचे अँकरिंग करताना प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, तो शो बंद झाल्यानंतर माझाच्या डिबेट शोचा सीन संपलाच.
सध्या न्यूज 18 लोकमत वगळता कोणत्याही मराठी चॅनलवर डिबेट शो उरलेला नाही. अशातच प्रसन्न जोशींचे ‘माझा’मध्ये पुनरागमन होत असल्याने, ‘माझा विशेष’ पुन्हा सुरू होईल का?’ हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
0 टिप्पण्या