NDTV मराठीच्या पीसीआरमध्ये सध्या जणू काही नळाच्या टाकीला छिद्र पडल्यासारखी परिस्थिती आहे! आठवड्याभरात दोन लोकांनी राजीनामा देऊन काढता पाय घेतला, आणि अजून किती जण उड्या मारणार याची हिशेबपट्टी सुरू झाली आहे.
गळतीला कारणीभूत कोण?
तर यामागचं प्रमुख कारण म्हणजे "नको त्या लोकांची ढवळाढवळ"! टेक्निकलमध्ये ज्यांना ‘ट’ ही कळत नाही, असे महाभाग पीसीआरमध्ये हात घालू पाहतात, आणि त्याचं थेट परिणामस्वरूप, खऱ्या टेक्निकल लोकांना "आता इथे थांबणं म्हणजे बुद्धिबळात हत्तीला सोंगट्यांसोबत खेळायला लावणं" असा फील यायला लागला.
बिचारा आत्माराम भिडे उर्फ रोनक कुकडे!
या सर्व गडबडीत रोनक कुकडे, म्हणजेच आत्माराम भिडे स्टाईलने "ज्याला जायचंय तो जावा, आम्हाला काही फरक पडत नाही!" अशी आत्मविश्वासपूर्ण घोषणा करतोय. पण नंतर कळतं की त्याला फरक पडत नाही, हे फक्त तो स्वतःला समजावत असतो!
‘बबीता’ त्याला साथ देते, पण…
संपूर्ण कार्यालयात चर्चा सुरू आहे की बबीता (गुप्त व्यक्तिरेखा) त्याला पाठिंबा देतेय, पण ती स्वतः मनात विचार करतेय – "मी तरी किती दिवस थांबू?" कारण कमी मॅनपॉवर आणि वाढता तणाव यामुळे सर्वांची सहनशक्ती संपत चाललीय.
‘आगे आगे देखो होता है क्या…’
या नाट्यमय प्रसंगानंतर पुढे काय होतं, हे पाहणं रंजक ठरणार आहे. अजून किती जण पाय काढतील? रोनक कुकडे अखेरचा वाचेल की ‘बबीता’ही त्याला रामराम ठोकून निघून जाईल? NDTV मराठीच्या पीसीआरच्या ‘धरणीकंपा’ची पुढची फेज लवकरच…!
बेरक्या अर्थात नारद यांची नजर या घटनेवर टाकलेली आहे. पुढच्या अपडेटसाठी बने राहो…!
0 टिप्पण्या