झोलर पत्रकाराची हॅटट्रिक—धक्कादायक कारनाम्यांचा पर्दाफाश!

 

पत्रकारितेचा बुरखा पांघरून झोलरगिरीचा धंदा करणाऱ्या एका अंबरनाथस्थित पत्रकाराची 'हकालपट्टी हॅटट्रिक' पूर्ण झाली आहे. या पत्रकाराने तीन-तीन मोठ्या चॅनेल्समध्ये धडाकेबाज कारनामे करून अखेर स्वतःचीच 'ब्रँड व्हॅल्यू' शून्यावर आणली आहे.

पहिल्या डावात TV9 मध्ये असताना एका राजकीय नेत्याची दुप्पट किमतीची जाहिरात घेऊन चॅनेलला अर्ध्या किमतीची जाहिरात पाठवून त्याने चॅनेललाच "मामा" बनवले. पण चोरी पकडली गेली आणि थेट हकालपट्टी!

दुसऱ्या इनिंगमध्ये ABP माझा मध्ये गेला, पण इथे त्याचा अजूनच मोठा घोटाळा समोर आला. पोलिसांच्या नावाने लाखो रुपये वसूल करण्याचा प्रकार ऑफिसपर्यंत पोहोचला, आणि पुन्हा एकदा दारात हकालपट्टीची नोटीस आली.

आता ताज्या प्रकरणात लोकशाही चॅनेलमध्येही त्याने मोठे 'सुपारी प्रकरण' घडवून आणले. मालकाच्या कानावर खबर पोहोचली आणि निकाल तोच—तिसऱ्यांदा हकालपट्टी!

पण हा महाशय अजूनही स्वतःला 'अजेय' समजतोय. "शर्म" नावाचा कप्पा कधीच रिकामा असल्याने, हा 'बेशरम' पत्रकार अजूनही नवे बळी शोधतोय, अशी जोरदार चर्चा आहे. आता हा 'राष्ट्रीय' लेव्हलवरून थेट घसरपट्टीवर आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

"पत्रकारिता" हवी की "झोलरगिरी"?—हा सवाल आता मीडियामध्ये गाजू लागलाय!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या