बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारनाम्यांमुळे गाजत असलेला सतीश उर्फ खोक्या भोसले अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. कुंभमेळा संपताच खोक्याने थेट प्रयागराज गाठलं आणि तिथं यूपी पोलिसांच्या सहकार्याने बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
टीव्ही 9 मराठीच्या 'एक्सक्लुझिव्ह' नंतर थेट प्रयागराज!
खोक्याच्या ‘EXCLUSIVE’ मुलाखतीमुळे आधीच मोठा गोंधळ उडाला होता. टीव्ही 9 मराठीला इंटरव्ह्यू दिल्यानंतर थेट प्रयागराज गाठणाऱ्या खोक्याला काल पोलिसांनी अटक केली. आता तो बीड पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू आहे.
‘ब्रेकिंग न्यूज’ महत्त्वाची की सत्य?’
प्रश्न असा आहे की फरार गुन्हेगाराला थेट स्क्रीनवर आणणाऱ्या आणि त्याला बोलण्याची संधी देणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी याला जबाबदारीने घेतलं का? पत्रकारितेच्या नावाखाली ‘गुन्हेगारांना हक्काचं व्यासपीठ’ देणं योग्य आहे का?
अखेर खोक्या पकडला, पण पत्रकारितेच्या नावाखाली चालणारा ‘PR गेम’ उघडकीस आला!
0 टिप्पण्या