ABP माझाचे 'ज्येष्ठ' (!) पत्रकार वैभव परब नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मिशन काश्मीर दौऱ्यावर गेले. पण, ही बातमी कशी समजली? तर त्यांच्या इंस्टा स्टोरीवरून – ज्यात हॉटेलच्या खिडकीतून दिसणाऱ्या डोंगरांचे सौंदर्य दाखवताना पार्श्वभूमीला एक गोडगोड रोमँटिक गाणं सुरु आहे.
आता हे पाहून प्रश्न असा उभा राहतो की –
हे "मिशन काश्मीर" आहे की "मिशन रोमँस"?
जिथे निष्पाप नागरिक आणि जवान शहीद होतायत, तिथे ‘क्लाउड विथ अ माउंटन व्हिव’ आणि त्या बॅकग्राऊंडला गोडगाणी?
ही तीच पत्रकारिता आहे का जिथे एकेकाळी रिपोर्टर मृतदेहांच्या शेजारी उभं राहून सत्याचा आरसा दाखवायचे?
की आता फक्त "क्लिक आणि क्लाऊड" चं रोमँटिक कव्हरेज हाच ‘TRP धर्म’?
आणि हो, कोणत्याही शहीदाच्या फोटोबाहेर उभं न राहता, त्यांच्या मड्यांवरचं लोणी खाणाऱ्या पत्रकारांची ही ‘डिजिटल औलाद’...
म्हणजे "नेशन वॉचिंग विथ नेचरल लाइट"!
पत्रकारितेच्या मिशनवर जेव्हा मिशन-रहित लोक जातात, तेव्हा त्यांची स्टोरी फीड नसते, फक्त फिल्टर असतो.
बेऱक्याचा झणझणीत सवाल :
"मिशन काश्मीर की रोमँस विथ व्हिव?"
पत्रकारितेचं मिशन की इंस्टाग्रामचा मिशन इम्पॉसिबल?
Video
0 टिप्पण्या