NDTV Marathi मध्ये 'ABP' गटाची गोंधळगिरी – 'AWFUL BUNCH PESTS' चं स्वाराज्य?


मुंबई : NDTV Marathi मध्ये सध्या काही "भूतपूर्व ABP"वाल्यांनी चक्क गोंधळाचा गडाच उभारला आहे. हे 'X-ABP' मंडळी NDTV मध्ये येऊन "AWFUL BUNCH PESTS" नावाचं गुप्त संघटनच चालवत आहेत का, असा संशय सध्या उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे. जर लवकरच NDTV मॅनेजमेंटने या गटाच्या कारवायांवर चाप लावला नाही, तर पुढच्या महिन्यात रेसिग्नेशनचा पाऊस पडेल – ही आतल्या सूत्रांची खात्रीशीर टिप आहे.

टिकरवाली बाई आणि  कुकडेची जोडी

टीकर रमतगमत वाचणारी बबीता आणि सदैव बावरलेला आत्माराम उर्फ " कुकडा" – या जोडीचा NDTV Marathi शी कसलाही भावनिक, बौद्धिक किंवा व्यावसायिक संबंध नाही. त्यांना फक्त वरच्या साहेबांची चापलुसी माहीत आहे. बातमीचं 'बी' माहीत नसतानाही हे दोघं मुख्य मंडळीत स्थान मिळवण्यात यशस्वी झालेत.

माणिक मोतीचा ‘माणिक ’ मॅनेजमेंट

या सगळ्यात "माणिक  मोती’ नावाचा ‘बॉस’ ही कथा अजून रंगवतोय. या महिन्यात त्याने तीन मुलींना ‘काम चांगलं नाही’ या सबबीखाली बाहेरचा रस्ता दाखवला. पण असं सांगणं म्हणजे उगाच कारणं देणं, कारण त्याला न आवडणाऱ्या मुलींचं काम 'वाईट', आणि आवडणाऱ्यांचं काम 'फर्स्ट क्लास' अशी त्याची अजोड कार्यशैली आहे.

सध्या या प्रकरणात काही मुली HRकडे तक्रार करण्याच्या तयारीत असून, लवकरच NDTV Marathi मध्ये एक स्फोटक वळण येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

‘न्यूज’पेक्षा ‘ड्रामा’ जास्त!

NDTV Marathi सध्या ‘न्यूज’पेक्षा ‘इनहाउस ड्रामा’मुळे चर्चेत आहे. आणि हे सर्व एक ‘AWFUL BUNCH PESTS’च्या घोंगड्यामुळे. वरून NDTV सारखं प्रतिष्ठित नाव, पण आतून ‘बदनामीचा भडका’ अशी अवस्था झाल्यास, हे महाराष्ट्रातलं सगळ्यात नवखं पण महत्त्वाचं मराठी न्यूज पोर्टल कधीच गाळात जाईल.

संपादकीय तळटीप:
ही बातमी NDTV Marathiच्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत सूत्रांवर आधारित असून, नावं व पात्रं त्यांच्या उपरोधात्मक स्वरूपात वापरलेली आहेत. कोणतीही विध्वंसक कारवाई टाळण्यासाठी व्यवस्थापनाने तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या