धाराशिवचा भारदस्त आवाज पुन्हा ‘लोकशाही मराठी’च्या स्क्रीनवर!

 

धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र आणि मराठवाड्यातील भारदस्त अँकर म्हणून ओळख असलेले करणसिंह पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. News Nation दिल्ली, लोकशाही मराठी आणि पुढारी असा प्रवास केल्यानंतर आता ते मुंबईमध्ये ‘लोकशाही मराठी’मध्ये अँकर म्हणून जॉईन होणार असल्याची जोरदार चर्चा मीडिया वर्तुळात सुरू आहे.

परखड मांडणी, दमदार आवाज आणि थेट प्रश्न विचारण्याच्या शैलीमुळे करणसिंह पवार यांनी अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. धाराशिवच्या मातीतून मुंबईच्या मीडिया विश्वात पोहोचलेल्या या चेहऱ्याच्या पुनरागमनाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी पत्रकारिता आणि मीडिया क्षेत्रात या चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या