अधिकृत इशारा – बेरक्या यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांना




काही समाजकंटक "बेरक्या" या नावाचा गैरवापर करून सोशल मीडियावर खोट्या, बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करत आहेत. अशा पोस्टचा बेरक्या ब्लॉग किंवा बेरक्या फेसबुक पेजशी कोणताही संबंध नाही.

सध्या व्हायरल होत असलेली "एका नीच... लबाड... हरामखोर कोल्ह्याचा अपेक्षित मृत्यू...!!" ही पोस्ट पूर्णपणे बनावट असून ती बेरक्या यांनी लिहिलेली किंवा प्रकाशित केलेली नाही.

जनतेला आवाहन :
बेरक्या ब्लॉग किंवा अधिकृत बेरक्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध झाल्याशिवाय कोणतीही पोस्ट, लेख किंवा बातमी खरी मानू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अशा पोस्ट पुढे पाठवू नका.

संबंधित व्यक्तीस कडक इशारा :
बेरक्या यांच्या नावाचा वापर करून खोटी माहिती पसरवणे, बदनामी करणे आणि जनतेची दिशाभूल करणे हा गंभीर कायदेशीर गुन्हा आहे. संबंधित व्यक्तीने तात्काळ अशा पोस्ट हटवाव्यात. अन्यथा उपलब्ध डिजिटल पुराव्यांच्या आधारे सायबर पोलीस आणि न्यायालयीन स्तरावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील.

सत्य एकच...
"बेरक्या ब्लॉग किंवा अधिकृत बेरक्या फेसबुक पेजवर जे प्रसिद्ध होईल, तेच बेरक्याचे अधिकृत मत समजावे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या