आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर 'न्यूज यात्रा' वेबसाईटचे दिमाखात लोकार्पण

 


छत्रपती संभाजीनगर - आषाढी एकादशीच्या पवित्र मुहूर्तावर 'न्यूज यात्रा' या नव्या न्यूज वेबसाईटचे प्रसिद्ध विचारवंत आणि शिक्षणतज्ञ सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते एका शानदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण समारंभाचे अध्यक्षस्थान प्रसिद्ध उद्योजक मानसिंह पवार यांनी भूषवले. तर, प्रमुख अतिथी म्हणून 'दिव्य मराठी'चे स्टेट हेड सुभाष बोंद्रे आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक व लेखक डॉ. डी. एस. काटे यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी 'न्यूज यात्रा'चे संपादक संजय वरकड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी डिजिटल माध्यमातील या नव्या पर्वाची नेमकी भूमिका आणि 'न्यूज यात्रा'ची पुढील दिशा उपस्थितांसमोर अत्यंत स्पष्टपणे विशद केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लॅपटॉपवर क्लिक करून वेबसाईटचे अधिकृत उद्घाटन संपन्न झाले.

या सोहळ्यासाठी पत्रकारिता, सामाजिक आणि व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत भराट यांनी अत्यंत खुमासदार पद्धतीने केले, तर प्रदीप साळुंके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली. 

ज्येष्ठ पत्रकार आणि वरकडीकार  संजय वरकड यांच्या https://newsyatra.in/ या  न्यूज वेबसाईटला बेरक्याच्या शुभेच्छा.. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या