बेरक्याचे निवेदन

गेल्या वर्षी म्हणजे २१ मार्च २०११ रोजी आम्ही  बेरक्या उर्फ नारद हा ब्लॉग सुरू केला. बरोबर एक महिन्यानंतर या ब्लॉगला एक वर्षे  पुर्ण होत आहेत. बेरक्या गेली एक वर्षे नॉन स्टॉप चालू आहे. आतापर्यंत या ब्लॉगला ३ लाख ६५ हजार हिटस् मिळाल्या आहेत. हा मराठी ब्लॉग विश्वातील एक इतिहास आहे. हे केवळ आपल्या प्रेमामुळे, स्नेहामुळे व आपुलकीमुळे घडले. आपण जर आमहाला पाठींबा व सहकार्य दिले नसते तर हा ब्लॉग लोकप्रिय झालाच नसता.त्यामुळे या यशाचे खरे श्रेय आपणास व आम्हाला बातम्या देणारे व पुवविणा-यांचे आहे.आम्ही केवळ निमित्त आहोत.
हा ब्लॉग केवळ पत्रकारांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आला आहे.चांगल्या पत्रकारांवर जो अन्याय होत होता, तो दूर करण्यासाठी हा ब्लॉग सुरू करण्यात आला आहे.म्हणूनच आम्ही पत्रकारांचा पाठीराखा - बेरक्या असे अभिमानाने म्हणतो.
हे करीत असताना आम्हाला अनेकांचा रोष पत्करावा लागला. काहींनी आम्हाला ई - मेलव्दारे धमक्या दिल्या, काहींनी पोलीसांच्या सायबर क्राईमकडे तक्रारी दिल्या.आजपर्यंत औरंबाबाद व पुणे येथे किमान सात तक्रारी दाखल झालेल्या आहेत, पण आम्ही कधीच घाबरलो नाही.आम्ही काही चोरी केली नाही, किंवा डाका टाकलेला नाही.पत्रकारांच्या कल्याणासाठी कधाही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत.
आम्ही चांगल्या पत्रकारांच्या विरोधात कधीच नाही व राहणार नाही.जे बदमाश आहेत, जे पत्रकारांच्या नावाला काळीमा फासत आहेत, पत्रकारितेच्या नावाखाली नको ते धंदे करीत आहेत, त्यांना उघडे करण्यासाठी हा ब्लॉग आहे.वाचा, विचार करा आणि सोडून द्या, अशी आमची भूमिका आहे.
असो, आपले असेच सहकार्य अपेक्षित आहे.
आपलाच,
बेरक्या उर्फ नारद
( पत्रकारांचा पाठीराखा
)

Post a Comment

0 Comments