बेरक्या ब्लॉगचा पहिला वर्धापनदिन...

गतवर्षी याच दिवशी म्हणजे २१ मार्च २०११ रोजी आम्ही बेरक्या उर्फ नारद हा ब्लॉग सुरू केला.गेल्या वर्षभरात आपण दिलेल्या भरभरून प्रेमामुळे आम्ही  4 लाख हिटस् चा जादूई टप्पा पार करून मराठी ब्लॉग विश्वास इतिहास रचला आहे...हे केवळ आपल्या प्रेम व स्नेहामुळे घडले आहे.हे यश आम्हाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणा-यांचे आहे, आम्ही केवळ निमित्त आहोत...पत्रकारांचा पाठीराखा, अशी आमची ओळख निर्माण झाली असून, ही ओळख कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत...
गेल्या वर्षभरात आमच्यावर असंख्य संकटे आली, परंतु आपल्या सहकार्यामुळे व ईश्वर कृपेमुळे ती दूर झाली...या ब्लॉगच्या माध्यमातून चांगल्या पत्रकारांचे कौतुक व्हावे, चांगल्या पत्रकारांवर होणारा अन्याय दूर व्हावा, पत्रकारांचे प्रश्न सुटावेत,त्यांच्या समस्या, अडचणी संबंधितांच्या कानावर जाव्यात, हा ऐकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून हा ब्लॉग सुरू करण्यात आलेला आहे.हा ब्लॉग अपेक्षापेक्षा लोकप्रिय होवूनही आम्ही त्याचा कधीची वैयक्तीक स्वार्थासार्ठी उपयोग केलेला नाही.बेरक्या उर्फ नारद हा पत्रकारांचा कॉमन मॅन आहे..म्हणूनच तो  पत्रकारांचा लाडका हिरो बनला आहे...
आम्हाला टक्कर देण्यासाठी व शह देण्यासाठी काही पावळ्यातील छत्र्या उगवल्या होत्या...परंतु त्यांचा पाण्याचा बुडबुडा काही काळातच विरला आहे...याचा आम्हाला अजिबात गर्व नाही, असा ब्लॉग सुरू करणा-यांना आमचा अजिबात विरोध नाही, उलट आम्हाला आनंदच आहे, परंतु आमच्या विरोधात उलट - सुलट लिहू नये, अशी अपेक्षा आहे...
हा ब्लॉग कोण्याही एका व्यक्तीचा नाही...त्यामुळे कोणाचेही नाव घेवू नये....पत्रकारांनी पत्रकारांसाठी चालविलेला हा ब्लॉग आहे...आपणही या ब्लॉगला बातम्या, लेख, फोटो पाठवू शकता...फक्त एकच अट आहे, त्यात सत्यता हवी...बस्स ऐवढेच....
आज बेरक्या ब्लॉगचा पहिला वर्धापनदिन आहे, आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी आहेतच...ही शिदोरी कायम ठेवत आम्ही पुढील वाटचाल करणार आहोत...
आपलाच ....
बेरक्या उर्फ नारद

Post a Comment

0 Comments