लोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाचं अतिशय फालतू सदर

1)
नमस्कार बेरक्या,

लोकसत्तामध्ये गेल्या काही महिन्यांपासून 'वाचावे नेटके' नावाचं एक अतिशय फालतू सदर संपादकीय पानावर सुरु झालेलं आहे. ब्लॉग्जच्या ओळखी करून देण्याच्या नावावर या सदरात ब्लॉगर्सना यथेच्छ लाथाळी केली जाते. आणि त्याहीउपर म्हणजे अतिशय विचित्र आणि अगम्य भाषेत लेख लिहिलेले असतात. मागे एकदा समस्त स्त्री ब्लॉगर्सच्या लिखाणावर अतिशय अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली गेली होती. काही आठवड्यांपूर्वी अगदी विनाकारण, काहीएक संबंध नसताना माझ्या ब्लॉगवर (www.harkatnay.com) आणि महेंद्र कुलकर्णी यांच्या ब्लॉगवर (www.kayvatelte.com) वैयक्तिक चिखलफेक झाली. मी त्याला माझ्या ब्लॉगवरून उत्तर दिलं. त्यानंतर काही आठवडे आडून आडून आणि गेल्या सोमवारी पुन्हा एकदा थेट माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन टोमणे मारले गेले. हे सगळं का चालू आहे याची मला कल्पना नाही पण चालू आहे एवढं खरं. गेल्या सोमवारच्या प्रकारानंतर मी संपादक गिरीश कुबेर यांना पत्र लिहिलं आणि तेच पत्र माझ्या ब्लॉगवरही टाकलं. त्या पत्रात मी खुलासेवारपणे त्यांच्या सदरातून माझ्या ब्लॉगला कसे टोमणे मारले गेले आहेत आणि एकूणच मराठी ब्लॉगर्सना वेळोवेळी कशी नावं ठेवली गेली आहेत याचे सगळे पुरावे दिले. कहर म्हणजे संपादकीय पानावर मिरवणाऱ्या या स्तंभात 'च्यायला' आणि 'बुडाखाली' यासारखे वृत्तपत्रीय भाषेला न शोभणारे शब्द राजरोसपणे वापरले गेले आहेत. असो.

गिरीश कुबेरांना लिहिलेलं पत्र माझ्या ब्लॉगवर या दुव्यावर वाचता येईल. त्याखालच्या प्रतिक्रियाही नक्की वाचा म्हणजे सर्वसामान्य वाचकांच्या प्रतिक्रिया लक्षात येतील. वृत्तपत्र आणि पत्रकार यांना 'बेरक्या' च वठणीवर आणू शकतो अशी कीर्ती ऐकून असल्याने तुम्हाला मेल करतो आहे. तुम्हाला जे काही शक्य होईल ते करावे ही विनंती. धन्यवाद.

आपला
हेरंब ओक
 heramboak@gmail.com



2
नमस्कार,

लोकसत्ता मधे दर सोमवारी वाचावे नेटके हे सदर लिहिले जाते. लिहिणारा टोपण नावाने लिहीतो,अभिनव गुप्त.   ह्याचे खरे नांव काय  आहे ते माहिती नाही,
सध्या हा माणूस अगदी अगम्य भाषेत काहीतरी लिहून वैयक्तिक टिपण्या करतोय ब्लॉगर्स वर. त्यातल्या त्यात हेरंब ओक आणि मी त्याच्या खास शुटींग टार्गेट वर आहे. एक पत्र पाठवलं होतं गिरिश कुबेरला, पण त्याने पण त्या पत्राचा उपयोग बातमीत अतिशय वाईट रितीने करून घेतला.

त्याला उत्तर म्हणून एक लेख लिहिला होता काय वाटेल ते ब्लॉग  वर, " कुरकुरे" नावाचा.

या  लेखानंतर त्याचे असे वागणे थांबेल असे वाटले होते पण , नंतरही  त्याच्या सदरा मधे  विक्षिप्तपणे माझ्यावर आणि हेरंब वर कॉमेंट्स करत असतोच.
नुकतेच एक पत्र  मी  आणि   हेरंबने पण गिरीश कुबेरांना पाठवले.  त्यालाही उत्तर दिलेले नाही गिरीश कुबेरांनी

हे सगळं करण्यामागचा त्यांचा उद्देश टीआरपी मिळवणे आहे असे दिसते. आमच्या वर टीका केली की मग आम्ही त्यावर उत्तर  देणारच, आणि त्याच्या सदराला प्रसिद्धी  वाढणार आणि वाचक मिळणार..सगळं काही टीआरपी साठी करताहेत कुबेर आणि तो अभिनव गुप्त. वाचक मिळवण्यासाठी  लोकसत्ताला या पातळीवर यावं लागतंय??

काय करावे? त्यावर पुन्हा  पुन्हा आम्ही लिहिलं< तर त्याची प्रसिद्धी वाढते, नाही लिहिलं तर तो जास्तच सोकावतोय.
बेरक्या काही मदत करू शकेल का?
महेंद्र


  गिरीश कुबेरांना लिहिलेले पत्र खालीजोडलेले आहे.
---------- Forwarded message ----------
From: Mahendra <kbmahendra@gmail.com>
Date: 2012/5/15
Subject: A letter from Heramb
To: "girish.kuber" <girish.kuber@expressindia.com
>


श्री गिरीश कुबेर यांस,
स.न.
मी  तुम्हाला लिहिलेले वैय्यक्तिक पत्र तुम्ही पेपर मधे  ज्या पद्धतिने
वापरले   , त्यावर मला काही म्हणावयाचे नाही. फक्त तो तुम्ही  माझ्या
कंबरेखाली केलेला वार होता एवढेच मला सांगावेसे वाटते.   वैयक्तिक पत्र
पाठवल्यावर वैय्यक्तिक उत्तर अपेक्षित असते,    पण कदाचित तुम्हाला तसे
वाटत नसावे.

 तसेच त्या नंतर ( म्हणजे माझ्या पत्रानंतर)  सुध्दा   त्या  अभिगुप्तला
त्याच्यावर आणि हेरंब वर  वैय्याक्तिक टीका करण्यापासून रहावले नाही.
दुसऱ्या आणि नंतरच्या आठवड्यात पण वैय्यक्तिक टिका केलेली आहे.

 तुमच्या बद्दल एक  अर्थशास्त्राचा गाढा अभ्यासक आणि चांगला लेखक म्हणून
एक आदर होता/अजूनही थोडा शिल्लक आहे.   ज्या तऱ्हेने तुम्ही अभिगुप्तला
सपोर्ट करीत आहात ,त्याच प्रकारे सुरु राहिले तर कदाचित तो पण  फार काळ
शिल्लक रहाणार नाही.

 ज्या प्रमाणे माझे पत्र तुम्ही प्रसिद्ध केलेत, तसेच हेरंब ओक ने
तुम्हाला  एक ओपन लेटर लिहिले आहे,त्याची लिक इथे देतोय.हे पत्र आणि
त्यावरच्या प्रतिक्रिया जर तुम्ही वाचावे नेटके मधे छापल्या तर ते  सदर
सध्या ज्या तऱ्हेने सदर जात आहे त्या पेक्षा निश्चितच वाचनिय़ होईल. जर
तुमची खरच हिम्मत असेल छापा ते पत्र जसेच्या तसे.. कॉमेंट्स पण छापल्या
तरी हरकत "नाही".
http://www.harkatnay.com/2012/05/blog-post_13.html