जळगाव गांवकरीतून सतीश अग्रवाल यांना नारळ

जळगाव- येथील गांवकरीचे व्यवस्थापक सतीश अग्रवाल यांना व्यवस्थापनाने परवाच नारळ दिले असून त्यांनी पुन्हा देशोन्नतीमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.
अत्यंत मिठ्ठास वाणी असणार्‍या सतीश अग्रवाल यांनी जळगाव येथील देशोन्नतीचे आवृत्ती प्रमुख म्हणून सुमारे पाच वर्षे काम केले. यानंतर विदर्भातील मातृभूमि हे वर्तमानपत्र जळगावला आणण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. या काळात तापी पतपेढीसह अन्य पतपेढ्यांवर मालिका लावण्यात आल्या अन् अचानक बंद झाल्या. यामागील कारण मातृभूमिकार बियाणी परिवाराच्या लक्षात येण्याआधीच त्यांनी मातृभूमि बंद केला. यानंतर त्यांनी गांवकरीचा रस्ता पकडला.
 याच काळात गांवकरीची धुरा ज्येष्ठ पत्रकार धों.ज. गुरव यांनी सांभाळली होती. गुरव यांनी मोठ्या मेहनतीने मरणपंथाला लागलेल्या गांवकरीमध्ये नवीन प्राण फुंकले. या वर्तमानपत्राचा अंक हलू लागला. मात्र गुरव यांच्या मेहनतीला सतीश अग्रवाल यांनी खर्‍या अर्थाने ‘कॅश’ केले. हे सारे होत असतांना अग्रवाल यांचा भलत्याच प्रकरणांमधील ‘इंटरेस्ट’ही चर्चेचा विषय बनला. जिल्ह्यात त्यांनी स्वत:चे ‘नेटवर्क’ उभारले होते. यामुळे नाशिक येथील मंडळीचे त्यांच्यावर ‘लक्ष’ होते. यातच त्यांना व्यवस्थापनाने परवाच नारळ दिल्याचे वृत्त आहे. अग्रवाल हे आपणास स्वातंत्र्य नसल्याने आपण गांवकरीवर लाथ मारल्याचे सांगतात. प्रत्यक्षात मात्र नाशिककरांशी संबंधीत एका प्रकरणामुळे व्यवस्थापनाने त्यांना अर्धचंद्र दिल्याचे समजते. सतीश अग्रवाल यांच्या जाण्यामुळे कर्मचारी सुखावले आहेत. मात्र गुरव यांच्या मेहनतीला योग्य न्याय देण्यासाठी व्यवस्थापनाने थोडा उदार दृष्टीकोण स्वीकारण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, गांवकरीनंतर काय करावे? या विचारात असणार्‍या अग्रवाल यांनी पुन्हा देशोन्नतीमध्ये जाण्याच्या हालचाली सुरू केल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे. त्यांनी अमरावतीला जाण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र यापूर्वीचा ‘अनुभव’ पाहता देशोन्नतीचे व्यवस्थापन त्यांना पुन्हा जवळ करेल याबाबत साशंकता आहे. अग्रवाल यांच्या जाण्यामुळे गांवकरीतील बहुतांश कर्मचार्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. अर्थात आता ते कुणाला ‘शेंडी’ लावतात? याकडे वर्तमानपत्रसृष्टीचे लक्ष लागून आहे


आता धो.ज.गुरवाना रान मोकळे  !
जळगाव - जळगाव गावकरीला आर्थिक स्थेर्य हे अग्रवाला मुळे मिळाले .ज्या गावकरीत ३-३ महिने पगार होत नव्हते तेथे  अग्रवाल आल्या पासून पगार वेळेवर होऊ लागले होते.पण ते गेल्यामुळे  कर्मचारी सध्या कमालीचे चिंतेत आहेत.धो. ज.गुरव आल्या पासून त्यांनीच आपले जुने वार्ताहर (लोकमत,देशदूत ) परत गावकरीत आणायला सुरुवात केली.त्यामुळे बरेच जुने वार्ताहर दुसऱ्या दैनिकात गेले.विजय राजहंस गेल्या नंतर धो.ज.गुरव यांना अग्रवाल यांनीच आणले त्यासाठी त्यांनी व्यवस्थापकाना बड्या मेहनतीने तयार केले (गुरव यांचा जुना इतिहास पाहता)जे तयार नव्हते ते तयार झाले. .अग्रवाल व व्यवस्थापक यांच्या मध्ये दैनिकाच्या  किमत वाढी वरून वाजल्याचे कळते.मात्र एवढे निचित कि गुरवना आता रान मोकळे झाले आहे.व आता देशदूत व लोकमत मध्ये असताना सारख्या मालिका सुरु होतील.

Post a Comment

0 Comments