पत्रकार संरक्षण कायदा, जनमत घ्या...

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात ७०० हून अधिक पत्रकारांवर हल्ला झाला आहे. यातील १० टक्के पत्रकार वगळता सर्व चांगले पत्रकार आहेत.विरोधात बातमी दिली म्हणून,त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.बीडला तर दोन पत्रकारांचे पाय कायमचे फॅक्चर करण्यात आले.ग्रामीण भागातील ९९ टक्के पत्रकार आज पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी करतात. मात्र शहरी भागातील काही मोजक्या पत्रकारांना पत्रकार संरक्षण कायद्याची गरज भासत नाही.
परवा आम्ही नागपुरात मुख्यमंत्र्यांना भेटलो असता मुख्यमंत्र्यांनी आम्हास स्पष्ट सांगितले की, तुमच्या काही पत्रकारांचा या कायद्याला विरोध आहे. याचाच अर्थ आमचे विरोधक, हे दुसरे, तिसरे कोणी नसून आमचेच काही लोक आहेत.
मुद्दा असा की, चार - दोन पत्रकारांचा विरोध म्हणजे संपूर्ण पत्रकारांचा विरोध नाही. शासनाला जर शंका असेल तर, या मुद्दावर महाराष्ट्रातील पत्रकारांचे  जनमत घ्यावे, जेणे करून हा प्रश्न एकदाचा निकाली निघेल.विनाकारण चालढकल करू नये.
मी येथे नमूद करतो की,माझ्यावर आजपर्यंत एकदाही हल्ला झाला नाही, माझ्यावर हल्ला करण्यासाठी संबंधितास दहा वेळेस विचार करावा लागतो.मी स्वत:साठी खंबीर आहे.मात्र मी सामान्य पत्रकारांचा विचार करतो.पत्रकारांच्या हितासाठी  या कायद्याचा मी पुरस्कार करीत आहे. ज्यांना कायद्या नको आहे, ते एकतर पत्रकारितेतून रिटायर्ड झाले असावेत किंवा ते ए./सी.मध्ये बसून लिखाण करीत असावेत,अशी शंका येते.
पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे, या मागणीसाठी बेरक्या सदैव आपल्यासोबत आहे...