नगरमध्ये सायंदैनिके मिळतात फुकट....

 नगर ही संताची तशी आता वृत्तपत्रांची भूमी होते की काय?नगरमध्ये लवकरच सुरू होत आणखी एक सायं दैनिक...सुभाष चिंधे आणि सुभाष मुदगल यांनी काढला हा पेपर.. सायंदैनिकांची संख्या वाढल्याने त्यांच्यात खपाची स्पर्धा सुरू झाली आहे. जाहिराती टिकवून ठेवण्यासाठी खपाचे आकडे वाढविणे आवश्यक ठरते. त्यामुळे बहुतेक सायंदैनिके फुकट वाटली जात आहेत. नव्याने आलेल्या सायंदैनिकांसोबतच जुन्या प्रस्थापित सायंदैनिकांनाही फुकट वाटप करावे लागत आहे.
 

सायं दैनिकांनध्ये सध्या अशोक सोनवणे सम्राट होऊ पाहत आहेत. त्यांचा पूर्वी लोकमंथन पेपर आहे. आता समर्थनगरी नावाचा पेपर काढला आहे. फुकट वाटप त्यामुळेच सुरू झाले आहे.सोनवणे यांना निवडणूक लढवायची आहे. सध्याचे शिवसेना आमदार अनिल राठोड यांच्याविरोधात रान पेटविण्यासाठी ते सायंदैनिकाचा वापर करू इच्छितात.
श्रीरामपूरमध्ये तर दीडशेहून अधिक साप्ताहिके आहेत. तेथे असे म्हणतात की जर पाच जण पुढे चालले असले, आणि पाठामागून कोणी अहो पत्रकार असा आवाज दिला तर त्यातील तिघे मागे वळून पाहतात.

नगरच्या पेपरमध्ये एकूण सगळीत चमकोगिरी सुरू आहे. येथे पगार आणि पगारवाढ यांची चिंता असलेले खूप थोडे पत्रकार शिल्लक आहेत. बाकीच्यांना कशाच काही देणेघेणे नाही. यातील निम्मे लोक हाैस म्हणून पत्रकार झाले आहेत तर काही आपले इतर धंदे सुरू ठेवण्यासाठी...


एक काळ असा होता की नगरची पत्रकारिता जागृत मानली जायची. त्यामुळे शरद पवारां सारखे नेते सुद्धा नगरच्या पत्रकारांना कधी टाळत नव्हते.