मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी चंद्रशेखर बेहेरे

मुंबई - पंच्याहत्तर वर्षांची परंपरा असलेल्या आणि मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणा़ऱ्या  मराठी पत्रकार परिषदेच्या कार्याध्यक्षपदी नंदूरबार येथील तापीकाठ दैनिकाचे संपादक चंद्रशेखर   बेहेरे यांची तर सरचिटणीसपदी माथेरान येथील पत्रकार संतोष पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक अधिकारी विजय पवार यांनी सोमवारी  या निकालांची मुंबई येथे घोषणा केली..ही निवड दोन वर्षांसाठी आहे.
मराठी पत्रकार परिषदेचे व्दैवार्षिक अधिवेशन 24 आणि25 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे होत आहे.या अधिवेशनात नवे पदाधिकारी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतील.परिषदेच्या घटनेनुसार विद्यमान कार्याध्यक्ष किरण नाईक 1 सप्टेंबरपासून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.परिषदेच्या कोषाध्यक्ष आणि अन्य पदांच्या नेमणुका नंतर जाहीर करण्यात येतील असे परिषदेतर्फे कळविण्यात आले आहे.चेंद्रशेखर बेहेरे गेले अनेक वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून तापीकाठ हे नंदूरबारमधील लोकप्रिय दैनिक ते चालवतात.त्यांच्या मालकीचे लोकल न्यूज चॅनलही आहे.नंदूरबार जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.संतोष पवार हे माथेरान येथील सकाळ दैनिकाचे वार्ताहर आहेत.गेली वीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत असलेल्या पवार यांनी रायगड जिल्हयात पत्रकारांचे भक्कम संघटन उभे केले आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाच्या आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.रायगड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे ते निमंत्रक असून माथेरान नगरपालिकेची ते नगरसेवकही आहेत.त्यांच्या निवडीने रायगडमधील पत्रकारांनी आनंद व्यक्त केला आहे.
परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख परिषदेचे विद्यमान कार्याध्यक्ष किरण नाईक,विध्यमान सरचिटणीस सिध्दार्थ शर्मा,सुभाष भारव्दाज,पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शऱद पाभळे,शरद वाळुंज यांनी बेहेरे आणि संतोष पवार यांचे अभिनंदन केले आहे.