देशमुख यांना निंबाळकर स्मृती पुरस्कार पत्रकार प्रदान

 
फलटण तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा हरिभाऊ निंबाळकर स्मृती पुरस्कार पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते मंगळवारी प्रदान करण्यात आला.
आपसातील व्यक्तिगत अथवा संघटनात्मक मतभेद किंवा हा प्रिन्टवाला तो इलेक्टा्रॉनिकवाला असे भेद बाजूला ठेऊन राज्यातील तमाम पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतल्या शिवाय राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांची दखल घेणार नाही असे मत व्यक्त करीत एस.एम.देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांना एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन केले.यावेळी परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक,अरविंद मेहता,माहिती उपसंचालक वर्षा शेडगे आदिंची भाषणे झाली.
 

एस.एम.देशमुख यांना याअगोदर विविध सोळा पुरस्कार मिळालेले आहेत.गेली 30 वर्षे पत्रकारितेत असलेल्या देशमुख यांची सहा पुस्तके प्रसिध्द झाली असून पत्रकारांवरील हल्ल्याच्या संदर्भात त्यांचे पुस्तक प्रसिध्दीच्या मार्गावर आहे.अनेक सामाजिक चळवळीत देशमुख यांचा पुढाकार असतो.कोकणात सेझ विरोधी आंदोलन,पाणी वाटपाच्या प्रश्नावरून लढला गेलेला लढा,आणि मुंबई-गोवा महामार्गाच्या रूदीकऱणासाठी कोकणातील पत्रकारांच्या सहकार्यानं देशमुख यांनी लढलेला प्रदीर्घ लढा ही काही त्याची उदाहरणं देता येतील.