मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड

मराठी पत्रकार परिषदेच्या आज पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या बैठकीत पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष भारद्वाज यांची परिषदेच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली.कोषाध्यक्षपदी अकोला येथील पत्रकार सिध्दार्थ शर्मा यांची निवड कऱण्यात आली तर कार्यकारिणीचे सदस्य म्हणून उस्मानाबाद येथील उस्मानाबाद लाइव्हचे पत्रकार सुनील ढेपे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीच्या घोषणा परिषदेचे अघ्यक्ष किरण नाईक यांनी केली.या बैठकीस पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख,परिषदेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे,सरचिटणीस संतोष पवार आणि विविध जिल्हयातील पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते.

पत्रकारांच्या हक्काची लढाई तीव्र कऱणार

राज्यातील 340 तालुक्यात शाखा विस्तार आणि साडेसात हजार पत्रकार सदस्य असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या काल पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले गेले आहेत.परिषदेचे यंदाचे अमृत महोत्सवी वर्षे असल्याने या काळात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. 1) पत्रकार जोडो अभियान राज्यात अनेक पत्रकार संघटना आहेत,त्यांच्यात आपसात मोठ्या प्रमाणात वाद आहेत एवढेच कशाला संघटनांतर्गत देखील मोठी गटबाजी असल्याने पत्रकारांमध्ये एकसंघपणा दिसत नाही.त्यामुळे आपल्या मागण्यांची पूर्तता करताना जो दबाव सरकारवर यायला हवा तो येताना दिसत नाही.अशा स्थितीत संघटनांनी आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवत किमान समान प्रश्नावर सर्व संघटनांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या बॅनरखाली एकत्र यावे.पत्रकार हल्ले,पेन्शन,आरोगय विषयक सुविधा,अधिस्वीकृती पत्रिका,गृह निर्माण, पत्रकार भवन हे प्रश्न सर्वच संघटना व्यक्तिगत पातळीवर मांडत असतात पण त्याचा प्रभाव फारसा पडत नाही म्हणूनच या समान प्रश्नांच्या पुर्ततेसाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.त्यासाठी परिषदेचे पदाधिकारी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात जावून पत्रकारांना एकत्र करण्याचा प्रय़त्न करतील.या योजनेचा शुभारंभ 29 तारखेला रत्नागिरी येथून करण्यात येणार आहे एस.एम.देशमुख आणि किरण नाईक ,संतोष पवार त्यासाठी रत्नागिरी येथे जात आहेत.तसा निर्णय परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. 2) दोन दिवस ध्या संघटनेसाठी पत्रकार समाजासाठी आपले आयुष्य वेचत असतो.या साऱ्या वाटचालीत अनेक पत्रकारांचे कुटुबाकडे दुर्लक्ष होते,आरोग्याकडे दुर्लक्ष होते आपल्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष होते.त्यामुळे सरकार दरबारी पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहतात.अनेक "विद्ववान" पत्रकारांना संघटनेचं काम म्हणजे रिकाम टेकड्यांचे उध्योग आहेत असं वाटतं.मात्र ही मंडळीच जेव्हा अडचणीत येते तेव्हा त्याना आवर्जुन संघटनांची आठवण येते.आपली एकी आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेण्यासाठी महिन्यातले फक्त दोन दिवस प्रत्येक पत्रकारांनी संघटनेसाठी द्यावेत अशी ही कल्पना आहे.दोन दिवस संघटनेसाठी अशी योजना परिषद आपल्या अमृत महोत्सवी वर्षात राबवत आहे. 3) जिल्हा अधिवेशने भरविणे पत्रकारांचे संघटन आणि पत्रकारांच्या प्रश्नांची चर्चा तसेच पत्रकारितेतील बदलते प्रवाह लक्षात घेऊन जिल्हा साहित्य संमेलनाच्या धर्तीवर एक दिवसाचे जिल्हा स्तरावर पत्रकार अधिवेशने घेऊन त्यात ग्रामीण भागातील पत्रकारांना नवे बदलाशी परिचय करून देण्याचा प्रयत्न होणार आहे विभागवार पत्रकार प्रशिक्षण शिबिरंही घेण्यात येणार आहेत.


साभार - उद्याचा बातमीदार