नागपुरातील पत्रकारावर भिक मागण्याची वेळ...

  हे पत्रकार आहेत आणि आज ते नागपुरातील रामदासपेठ भागात रस्त्यावर तुम्हाला ते भिक मागताना दिसतील. एकेकाळचे गाजलेले वृत्तपत्र नागपूर टाइम्स या दैनिकात ते पत्रकार होते. अनेकांना त्यांनी पत्रकारितेची बाराखडी शिकविली. अनेकांनी त्यांच्यासोबत काम केले आहे. परंतु आपला सहकारी नागपुरातील रस्त्यावर भिक मागतो आहे,
याबद्दल कोणालाही खंत असल्याची दिसून येत नाही. हीच खरी खेदजनक बाब आहे.
नागपुरातील पत्रकारांचे नेतृत्व करणाºयांनी दासगुप्ता यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, तसेच शासनाकडूनही काही मदत मिळवून त्यांची दैनावस्था दूर करायला हवी होती. दासगुप्ता यांच्यावर ही वेळ स्वत:ला ज्ञानयोगी म्हणवून घेणाºया स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी आणली आहे. एसटी व कारच्या अपघातात जिचकार यांचा २ जून २००४ मध्ये मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र मोटार व्हेईकल ट्रायब्युनलमध्ये नुकसान भरभाईचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी  १ नोव्हेंबर २०१३ रोजी त्यांच्या कुटुंबीयांना ५०.६७ लाख रुपये देण्याचे आदेश एसटी महामंडळाला दिले आहे. परंतु ज्ञानयोग्यांनी नागपूर टाइम्स हे वृत्तपत्र बंद पाडून अनेकांच्या आयुष्याचे बजेट झिरो करून दासगुप्ता यांच्यावर भिक मागण्याची वेळ आणली. दासगुप्ता यांचे आयुष्यच त्यांच्यामुळे उद्ध्वस्त झाले त्यामुळे जिचकार कुटुंबीयांनी त्यांना मदत करण्याची गरज आहे. परंतु असे होणार नाही आणि पत्रकार बंधूही
त्यांच्या मदतीला धावणार नाही, हे स्पष्ट आहे. बघु
 या याप्रकरणी कोण काय करतात ते?

बेरक्यातर्फे नम्र आवाहन
.................................
नागपुरातील पत्रकार दासगुप्ता यांच्यावर भीक मागण्याची दुर्देवी पाळी आल्याची बातमी वाचून माझे मन गेल्या दोन दिवसांपासून सुन्न झाले आहे.त्यामुळे मी दीपावली अत्यंत साध्या पध्दतीने साजरी करीत आहे.तसेच माझ्या वतीने फुल ना फुलाची पाकळी म्हणून दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच नागपुरातील माझ्या काही सहकाऱ्यांना दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे,ऐवढेच नाही तर दासगुप्ता यांना कायमस्वरूपी काय मदत करता येईल,यासाठी बोलणी सुरू आहे.
मित्रानो,पत्रकारितेत एक वर्षापुर्वी आलेले काही नवखे चार चाकी घेवून फिरत आहेत,आणि दुसरेकडे वर्षेनुवर्षे प्रामाणिक पत्रकारिता करणाऱ्यावर भीक मागण्याची पाळी येत आहे.हे विरोधाभास पाहिला की,मनाना खूप वेदना होतात.प्रामाणिक पत्रकारितेचे हेच का फळ,असे वाटते...
असो,आपणही आपल्या परिने दासगुप्ता यांना आर्थिक मदत करावी,त्यासाठी आपल्या जवळच्या नागपुरातील पत्रकारांशी संपर्क साधावा किंवा आम्ही नागपुरातील एका वृत्तपत्राच्या माध्यमातून दासगुप्ता यांच्यासाठी मदतनिधीचे आवाहन करीत आहोत,तेथेही आपण मदत करू शकता.

दासगुप्ता यांनी लग्न न केल्यामुळे त्यांना कोणीही वारस नाही.त्यामुळे ते बेवारस होवून भीक मागत आहेत.कृपया सर्वांकडून मदतीची अपेक्षा...
...........................................

नागपुरातील पत्रकार दासगुप्ता यांना आर्थिक मदत करण्यासाठी नागपुरचे पत्रकार Suresh Charde (मो 9595529080) यांच्याशी संपर्क साधावा...
----बेरक्या उर्फ नारद