मंदार फणसे यांचा अखेर जय महाराष्ट्र...

मुंबई - सहाच महिन्यापुर्वी सुरू झालेल्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये मोठी खळबळ सुरू झाली आहे.अनावश्यक भरती आणि अनावश्यक खर्चामुळे हे चॅनल प्रचंड आर्थिक तोट्यात चालले होते.त्यातून मार्ग काढण्यासाठी व्यवस्थापनाने कामगार कपातीचे धोरण सुरू केले आणि किमान ५० जणांना नारळ देण्याचा निर्णय घेतला.त्याच्या निषेधार्थ संपादक मंदार फणसे यांनी,राजीनामा देण्याचे शस्त्र उगारले पण व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने फणसे आपला राजीनामा अखेर सुपूर्द केला आहे.या राजीनाम्यानंतर मंगळवारी त्यांचा लक्षवेधी हा कार्यक्रमही झाला नाही.
  डान्सबार मालक सुधाकर शेट्टी यांनी सहा महिन्यापुर्वी मोठा गाजावाजा करून जय महाराष्ट्र न्यूज चॅनल सुरू केले,पण ढिसाळ व्यवस्थापनामुळे आणि तांत्रिक चुकामुळे हे चॅनल उभारी घेवू शकले नाही.त्यात अनावश्यक भरती,अनावश्यक खर्च यामुळे हे चॅनल प्रचंड आर्थिक तोट्यात चालले होते.अखेर मालकांनी कामगार कपातीचा निर्णय घेतला.मात्र संपादक मंदार फणसे यांनी त्यास विरोध केला.काम करणा-यावर अन्याय होणार असेल तर मला संपादकवद मिरवण्यात रस नाही,असे त्यांनी व्यवस्थापनाला ठणकावले मात्र मालक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने फणसेंनी अखेर जय महाराष्ट्र केला आहे.
हे चॅनल सुरू झाल्यानंतर केवळ तीन महिन्याच कार्यकारी संपादक रवी आंबेकर यांनी जय महाराष्ट्र केला होता,आता सहा महिन्यानंतर फणसे यांनी जय महाराष्ट्र केला आहे.आता अनेकांना नारळ मिळणार आहे,त्यात कोण जाणार आणि कोण राहणार,याकडे लक्ष वेधले आहे.
गंमत म्हणजे आंबेकर यांच्या जागी शैलेश लांबे काही दिवसांपुर्वी जॉईन झाले होते.आजच त्यांनी काही लोकांना जॉईन झाल्याचे एसएमएस पाठविले होते,आणि दुसरीकडे धक्कादायक बातमी फणसेंचा राजीनाम्याची ठरली.फणसे यांनी कालच व्यवस्थापनाने दिलेली कार व्यवस्थापकाकडे परत करून स्वत:च्या गाडीने गेले होते,आणि आज त्यांचा लक्षवेधी हा कार्यक्रमही झाला नाही.कालपासून फणसेंच्या राजीनाम्याच्या बातम्या बेरक्याकडे येत होत्या,पण आज त्यास दुजोरा मिळाला.
जय महाराष्ट्रमधून किमान ५० लोकांना नारळ मिळणार आहे,त्यापैकी समजलेली नावे.
मंगेश चिवटे (दिल्ली), संदीप काळे (लातूर), राऊत (अमरावती), प्रकाश बेळगोजी (बेळगाव), औरंगाबादचा एक रिपोर्टर, नाशिक ब्युरो कार्यालयातील तीन,नागपूर ब्युरोतून एक.
 ..............................................
जाता - जाता : कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांनी व्यवस्थापनाच्या विरोधात ब्र शब्दही काढला नाही.त्यांच्यामुळे अनेकजण चांगला जॉब सोडून जय महाराष्ट्रमध्ये आले आहेत,आता त्यांच्यावर अन्याय होताना,भोईटे काय भूमिका घेणार,याकडे लक्ष.