महाराष्ट्राच्या मानबिंदूत अजब घडले...

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या मानबिंदूत मोठे अजब घडले आहे.ब्युरो चिफ नजिर शेख यांनी मालकाच्या विरोधातच बातमी दिली आणि त्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले.त्यांची ब्युरो चिफ पदावरून हकालपट्टी करून विजय सरवदेंकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

घडले असे की,विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या आमदाराचा निधी किती वापर केला याची माहिती सर्वच जिल्हा प्रतिनिधी देत आहेत.त्याच प्रकारे ब्युरो चिफ नजिर शेख यांनीही आमदार आणि मंत्री राजेंद्र दर्डा यांचा किती निधी वापस गेला याची बातमी दिली.ते देताना संपादक सुधीर महाजन यांना बातमी दाखवली.महाजन यांनी मी आहे,तु बातमी दे,असे सांगितल्यामुळे शेख यांचे मालकाविरूध्द बातमी देण्याचे धाडस वाढले.पण जेव्हा बातमी प्रकाशित झाली,तेव्हा दर्डा खवळले.त्यांनी संपादक विभागाची खरडपट्टी केली आणि शेवटी बळीचा बकरा शेख यांना बनविण्यात आले.शेख यांची ब्युरो चिफ पदावर हकालपट्टी करण्यात आली.ज्या महाजन यांनी बातमी देण्यास सांगितले,त्यांनी सुध्दा हात वर केले.
सध्या विजय सरवदे यांच्याकडे ब्युरो चिफ पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला आहे.

दुसरीकडे रिपोर्टर विनोद काकडे यांनी पगारवाढ न केल्यामुळे आणि जालनाला बदली केल्यामुळे राजीनामा दिला आहे.काकडे खरच आता लोकमत सोडणार का याकडे लक्ष वेधले आहे.