जळगाव - सकाळच्या खानदेश आवृत्तीच्या निवासी संपादकपदी भालचंद्र
पिंपळवाडकर यांची पदोन्नती करण्यात आली आहे. यापूर्वी ते सहयोगी संपादक
म्हणून खानदेश आवृत्तीचे काम बघायचे. श्री. पिंपळवाडकर
यांनी दैनिक तरुण भारतपासून पत्रकारितेची सुरवात केली आहे. नंतर
औरंगाबादच्या लोकमत, कोल्हापूरच्या पुढारीत काही वर्षे आणि सकाळमध्ये
सहयोगी संपादक म्हणून रूजू होण्यापूर्वी पुढारीच्या मुंबई आवृत्तीचे
वृत्तसंपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. खानदेश आवृत्तीची धुरा
सांभाळल्यानंतर त्यांनी दोन वर्षांत आवृत्तीचा चेहरामोहरा बदलला. त्यांच्या
कार्याची दखल घेऊन सकाळने अधिक जबाबदारी त्यांच्यावर टाकली, असे सांगण्यात
येते. अनिल जोशी झाले डेप्युटी जनरल मॅनेजर
सकाळचे खानदेश युनिट हेड अनिल जोशी यांचीही पदोन्नती झाली असून, ते आता डेप्युटी जनरल मॅनेजर झाले आहेत.
