बेरक्या इम्पॅक्ट : लोकमत कर्मचा-यांना अखेर मजीठिया वेतन आयोग लागू

नागपूर - मजीठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचा आदेश सर्वोच्य न्यायालयाने देवूनही,लोकमतचे दर्डा शेठ गप्प होते.यासंदर्भात बेरक्याने वारंवार बातम्या देवून वस्तुस्थिती मांडली.कर्मचा-यांचा लढा आणि बेरक्याच्या बातम्यापुढे अखेर दर्डा शेठ झुकले असून,त्यांनी मजीठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे पत्र आपल्या नोटीस बोर्डावर लावले आहे.
या वेतन आयोगाचा लाभ लोकमतमधील जवळपास ४८० कर्मचा-यांना मिळू शकतो.नोव्हेबर ११ पासून याची अंमलबजावणी करण्याचे आदेश आहेत.त्यामुळे मागील फरक भत्ता येत्या वर्षभरात चार टप्प्यात मिळणार आहे.एका कर्मचा-यास किमान २ लाख आणि जास्तीत जास्त ८ लाख रूपये फरक मिळू शकतो.तसेच पुढील महिन्यापासून त्यांच्या पगारात घसघसीत वाढ मिळणार आहे.येणा-या पगारात मागील फरक भत्ता सुध्दा मिळणार आहे.
अखेर मजीठिया वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यास दर्डा शेठ तयार झाल्यामुळे अनेक कर्मचा-यांनी बेरक्यास धन्यवाद दिले असून आभार मानले आहे.
जाता - जाता :
बेरक्याला कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नाही.हवी आहे साथ आणि प्रेम...
बेरक्या नेहमी आपल्या सोबत आहे.