मंगळवेढ्यात पत्रकारांतील वाद विकोपास

सोलापूर जिल्ह्यातील दामाजी पंतांच्या मंगळवेढ्यात दोन स्थानिक दैनिकाच्या संपादकातील वाद विकोपास...दैनिक दामाजी एक्स्प्रेसचे संपादक दिंगबर भगरे आणि दैनिक सुर्यनारायणचे संपादक औदुंबर ढावरे यांच्यात वाद पेटला .. ऐकमेकांच्या विरोधात बातम्या...सुर्यनारायणमधील बातम्या लोकमतचे तालुका प्रतिनिधी मल्लीकार्जुन देशमुखे दिल्याचा भगरे यांचा संशय...ढावरे राहिले बाजूला आणि भगरे आणि देशमुखें यांच्यात तेढ...यातून मंगळवेढा पोलीस ठाण्यात खोट्या तक्रारी.....सर्वप्रथम खंडणीची तक्रार नंतर गळ्याला चाकू लावला ,अंगावर गाडी घालून ठार मारणाचा प्रयत्न केला अश्या परस्परविरोधी तक्रारी दाखल...पोलीसांना पत्रकारांतील भांडणे पाहून वैताग आला आणि शेवटी खोट्या तक्रारीवरून दिंगबर भगरे यास पोलिसांनी लॉकअपमध्ये गजाआड केले,त्याचबरोबर देशमुखे यांचा भाऊ आणि मेहुण्यासही अटक केली.लोकमतचे तालुका प्रतिनिधी मल्लीकार्जुन देशमुखे फरार असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकारांतील खालच्या थरातील भांडणे पाहून संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात चर्चा आणि चिड...
हे ऐकूण आणि वाचून आम्हीही सुन्न झालो आहोत...
हे पाहून वैकुंठातून दामाजी पंत पण रडत असतील आणि म्हणत असतील विठोबा राया धाव रे...