सोलापुरात सुराज्यची घोडदौड

सोलापुरातील स्थानिक दैनिक सुराज्यने नविन अत्याधुनिक प्रिंटींग युनीट खरेदी केले असून,ते उभारणीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.येत्या काही दिवसांत सुराज्य,सोलापूरचा अंक १६ पानी होणार असून सर्वच्या सर्व पाने रंगित राहणार आहेत.

सोलापुरातील सर्वात जुने दैनिक संचार.२० वर्षापुर्वी सोलापूर आणि शेजारच्या उस्मानाबादमध्ये कोणत्याही वृत्तपत्राला संचार संबोधले जात होते.मात्र नंतरच्या स्पर्धेत केसरी आणि तरूण भारत दाखल झाला.सोलापूरातून केसरी लोप पावला असून,या दैनिकांतच वृत्तसंपादक म्हणून काम करणारे राकेश टोळ्ये यांनी केसरीची पोकळी भरून काढली आहे.१३ वर्षापुर्वी सोलापूरातील ज्येष्ठ काँग्रेस नेते विष्णुपंत कोठे यांनी सुराज्य सुरू केले.त्याचे पहिले संपादक राजा माने होते.माने आता लोकमतचे संपादक आहेत.माने यांच्यानंतर हरिश कैंची आणि त्यानंतर राकेश टोळ्ये संपादक झाले.टोळ्ये यांची या दैनिकात भागिदारी असून,टोळ्येंनी या दैनिकांचा वटवृक्ष केला आहे.सध्या हे दैनिक १२ पानी असून,पहिले आणि शेवटचे पान रंगित आहे.आता अत्याधुनिक प्रिंटींग युनिटमुळे एकाच वेळी सोळा पाने तेही सर्वच्या सर्व रंगित निघणार आहेत.याबद्दल संपादक राकेश टोळ्ये यांचे अभिनंदन.
सोलापूरात लोकमत,सकाळ,दिव्य मराठी बरोंबर संचार आणि सुराज्य यामध्ये स्पर्धा रंगणार आहे.या स्पर्धेतून वाचकांना दर्जेदार बातम्या वाचण्यास मिळाव्यात ही अपेक्षा.