ABP माझाचा उलटा प्रवास सुरू...

ABP माझा (जुने नाव स्टार माझा) जेव्हा सुरू झाले तेव्हा त्याची टींगल बालगोपाळांचे चॅनल म्हणून केली जात होती,तेव्हा झी २४ तास नंबर १ वर होते.मात्र नंतर माझाने झेप घेतली.मात्र नंतर आयबीएन -लोकमत सुरू झाल्यानंतर माझा पुन्हा खाली आला आणि नंतर दोन वर्षानंतर पुन्हा माझाने झेप घेतली.
गेली अनेक वर्षे माझा क्रमांक १ वर होता,परंतु गेल्या काही महिन्यापासून माझाला उतरली कळा लागलेली आहे.
ज्यांनी माझाला खरे रूप दिले त्या माणिक मुंडेंना एका मुलीच्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.त्यानंतर एक महिन्यापुर्वी स्टार रिपोर्टर निलेश खरे यांनी माझाला रामराम ठोकून मी मराठीची वाट धरली आणि आता स्टार एंकर प्रसन्न जोशींनी माझाला जय महाराष्ट्र करून जय महाराष्ट्रमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय.आता उरले आहेत शांत आणि संयमी एंकर मिलींद भागवत आणि आणखी एक पडद्यामागचा कलाकार राहूल खिचडी.माझाच्या स्टो-यांंना जो जबरदस्त आवाज असतो,तो आहे राहूल खिचडी यांचा आहे.खिचडी यांनी माझा सोडला तर माझाची खिचडी झालीच समजा...
मुंडे यांच्या राजीनाम्याचे कारण जगजाहीर असले तरी निलेश खरे आणि प्रसन्न जोशींच्या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.मिळालेल्या माहितीनुसार खरे आणि जोशी यांना पगाराचा आकडा लाखाच्या वर पार केलेला होता.मँनेजमेंटला आता त्यांना पगारवाढ द्यायची नव्हती,म्हणून दोघांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जातय,दुसरे असे की,जास्त पगाराची आणि दीर्घ काळाची माणसे काढून मँनेजमेंटला नविन फ्रेश माणसे भरती करायची आहेत.
असो,एकामागून एक तीन मोहरे गळाल्यामुळं माझाचा आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे.संपादक राजीव खांडेकर यांचा चेहरा माझाला तारू शकत नाही.त्यासाठी हवे आहेत,दमदार खेळाडू आणि हे दमदार खेळाडू आता माझाला लवकर गवसणे अशक्य आहे...