चंद्रशेखऱ बेहेरे यांचा राजीनामा

मराठी पत्रकार परिषदेच्या 25 ऑगस्ट 2015 रोजी मुंबईतील प्रेस क्लबच्या सभागृहात झालेल्या बैठकीत परिषदेचे तत्कालिन कार्याध्यक्ष चंद्रशेखर बेहेरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.राजीनामा पत्रात ते म्हणतात की,मी 1 सप्टेंबर 2015 पासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार होतो मात्र माझ्यावर दाखल असलेल्या विविध न्यायालयीन खटल्यांमुळे मी अध्यक्षपदाची धुरा सांभाळू इच्छित नाही.
चंद्रशेखर बेहेरे यांचा हा राजीनामा मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीने एकमताने मंजूर केला असून पुढील व्यवस्था होईपर्यत विद्यमान कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांना अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची सूचना केली आहे.
चंद्रशेखर बेहेरे यांच्यावर नंदुरबारमधील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे विविध आठ गुन्हे दाखल आहेत.त्यातील काही प्रकऱणात त्यांना अटकही झालेली आहे.शिवाय ते ज्या नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सदस्य असल्याचे सांगतात तो नंदुरबार जिल्हा पत्रकार संघच 2007 पासून अस्तित्वात नसल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून समोर आलेलं आहे.जिल्हा संघाचा सदस्य हाच परिषदेचा सदस्य असतो.मात्र नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघचं अस्तित्वात नसल्याने ते परिषदेचेही सदस्य नाहीत.परिषदेचा सदस्य नसलेली व्यक्ती परिषदेचा कार्याध्यक्ष अथवा अध्यक्ष होऊ शकत नाही हे वास्तवही त्यांच्या निदर्शनास समोर आल्यानंतर त्यांनी स्वखुषीने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी राजीनामा देऊन परिषदेची संभाव्य बदनामी टाळल्याबद्दल कार्यकारिणीने त्यांना धन्यवाद दिले आहेत.चंद्रशेखर बेहेरे यांनी स्वतःहून आपल्यापदाचा राजीनामा दिलेला असल्याने आता त्यांचा परिषदेशी दुरान्वयानेही संबंध राहिला नसल्याचे परिषदेच्या पत्रकात स्पष्ट कऱण्यात आले आहे.
परिषदेच्यावतीने बेहेरे यांचे नाव अधिस्वीकृती समितीसाठी पाठविण्यात आले होते.मात्र ते नावही आता मागे घेण्यात येत असल्याचे परिषदेचे प्रभारी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा आणि सरचिटणीस यशवंत पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.


...........


अधिस्वीकृति समिति मध्ये 2 महिला सदस्य घेणार। सरकारची मंजूरी
आता नामनिर्देशित सदस्य संख्या 9 वरुन 11 होणार
एकूण समिति 27 सदस्यांची