कर्मचारी कपात करण्यासाठी दैनिक लोकमतचा अजब फंडा

औरंगाबाद - प्रिंट मीडीयात सध्या मंदीचे वातावरण आहे.अश्या परिस्थितीत सकाळने औरंगाबादला अत्याधुनिक २० पाने एकाच वेळी सप्तरंगात छपाई करणारी प्रिंटींग मशिन बसवली आणि नांदेड आणि अकोला आवृत्ती लवकरात लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.मात्र दुसरीकडे लोकमत वृत्तपत्र समुहाने ४० टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी अजब फंडा वापरण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात विशेषत: मराठवाडा विभागात पडलेला दुष्काळामुळे जाहिरातीचे प्रमाण कमी झाले आहे,त्याचबरोबर कंपन्याकडून मिळणा-या व्यावसायिक जाहिरातीमध्ये घट झाल्याने लोकमतने कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आहे.
त्यासाठी नव्या लोकांची भरती न करणे,नव्या लोकांना कंत्राट वाढवून न देणे त्याचबरोबर ५५ वर्षाच्या पुढील कायमस्वरूपी लोकांना सक्तीने रजेवर पाठवणे असे निर्णय घेतले आहेत.त्याचबरोबर आणखी एक अजब फंडा वापरण्यात येणार आहे.
ट्रेनी रिपोर्टर ते वृत्तसंपादकांना आता एक पात्रता परिक्षा द्यावी लागणार आहे.जे या परिक्षेत नापास होतील,त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.औरंगाबादचे संपादक सुधीर महाजन यांना सर्वात कठीण  पेपर काढण्याचे आणि पेपर तपासण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.त्यामुळे सुधीर भाऊ दर्डाशेठच्या तालावर चांगलेच नाचत आहेत.आता बघा कसे एकाएकांना घरी पाठवतो,असे ते म्हणत आहेत.
ज्यावेळी  भरती करण्यात आली,त्यावेळी कोणते निकष वापरण्यात आले होते,त्यावेळी त्यांची पात्रता तपासण्यात आली नव्हती का ? आता मंदीचे वातावरण आल्यानंतर पात्रता आठवू लागली आहे का,असे प्रश्न लोकमतचे कर्मचारी विचारू लागले आहेत.दर्डाशेठच्या या अजब फंड्यामुळे लोकमतचे कर्मचारी त्रस्त झाले असून,हाबकून गेले आहेत.सकाळी १० ते रात्री ११ असे बारा ते १३ घंटे राबून त्यांच्या पदरात शेवटी निराशाच पडत आहे.
दुसरीकडे सकाळची नांदेड आवृत्ती सुरू होणार म्हटल्यानंतर दर्डा शेठना व्यावसायिक धर्म आठवला आहे.त्यांनी तेथील संपादकीय विभाग प्रमुख धर्मराज हल्लाळे यांना १२ लाखाची कार गिप्ट दिली आहे.अट एकच आहे,लोकमत सोडायचे नाही आणि सकाळला नांदेड,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये  पाय रोवू द्यायचे नाही.धर्मराज आता दर्डाशेठसाठी लंगोट काढून तयार झाले आहेत.
धन्य ते दर्डा शेठ...धन्य तो त्यांचा धर्म आणि धन्य तो त्यांचा राज ...