मराठवाड्यात सकाळ कात टाकणार....

औरंगाबाद - सकाळची औरंगाबाद आवृत्ती लवकरच सर्व पाने रंगित होणार आहे.नविन प्रिंटींग युनिटचे सध्या ट्रायल सुरू असून,येत्या 26 जानेवारी पासून औरंगाबाद सकाळ नवे रूप घेवून वाचकांसमोर येईल.
बेरक्याला मिळालेल्या माहितीनुसार,अत्याधुनिक नविन प्रिंटींग मशिन औरंगाबादेत बसवण्यात आले असून,सध्या त्याचे ट्रायल सुरू आहे.औरंगाबादचे प्रिंटींग युनिट नांदेडला हलवण्यात येणार असून,नांदेड,हिंगोली आणि परभणीसाठी नांदेडहून प्रिंटींग होवून वाचकांना अंक मिळणार आहे.त्यामुळे सकाळच्या औरंगाबाद,जालना आणि बीड शहर आणि जिल्ह्यातील वाचकांना पुर्ण पाने रंगित असलेला अंक तर नांदेड,हिंगोली आणि परभणीच्या वाचकांना लवकर अंक आणि उशिरातल्या उशिरा बातम्या वाचायला मिळणार आहे.
त्याचबरोबर वाळूज - पंढरपूर कार्यालय सुरू करण्यात आले आहे.याठिकाणी वृत्तपत्राची मोजकीच कार्यालये आहेत.
सकाळचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांच्या नेतृत्वाखाली सकाळची टीम उत्साहाने कामाला लागली आहे.त्यांना बेरक्याच्या शुभेच्छा....
त्याचबरोबर सकाळची अकोला आवृत्तीही लवकरच सुरू होणार असून,त्याची जय्यत तयारी सुरू आहे.